News Flash

अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण होणार !

दोन दिवस मासेमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला

संग्रहीत

हवामान तज्ज्ञांनी अरबी समुद्रात एक चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या दरम्यान कोकणासह मुंबईमध्ये पावसाच्या सरी कोसळतील, असे मतही हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तर सुरक्षितेसाठी मासेमारांनी ११ व १२ जून रोजी अरबी समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

याशिवाय ११ व १२ जून दरम्यान राज्याच्या किनारपट्टीपासून हे चक्रीवादळ सुमारे ३०० किलोमीटर दूर राहील, असे सांगण्यात आले आहे. तर, हे चक्रीवादळ राज्यात धडकण्याची शक्यता नाही, मात्र त्याच्या प्रभावामुळे या कालखंडात किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या काळात चक्रीवादळाच्या टप्प्यात असलेला व किनारपट्टीजवळ असलेला समुद्र काही प्रमाणात खवळलेला दिसणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2019 4:39 pm

Web Title: the cyclone situatuion in the arabian sea will be created msr 87
Next Stories
1 तीनही रेल्वे मार्गांवर ‘मेगा ब्लॉक’, मुंबई-पुणे दरम्यानच्या अनेक एक्स्प्रेसवर परिणाम
2 ‘भाषां’मुळे निकालघसरण; लिहिण्याच्या सवयीअभावी विद्यार्थ्यांची अडचण 
3 मुंबई विभागाचा निकाल ७७ टक्के
Just Now!
X