01 October 2020

News Flash

उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचा, विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे – प्रफुल्ल पटेल

या बैठकीत सर्व मुद्द्यांवर अंतिम चर्चा झाली असल्याचे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे.

महाविकास आघाडीच्या सरकारचा उद्या शपथविधी पार पडणार आहे. यापार्श्वभूमीवर मुंबईत आघाडीची आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व मुद्द्यांवर अंतिम चर्चा झाली असल्याचे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार, या सरकारमध्ये एकमेव राष्ट्रवादी काँग्रेसचा उपमुख्यमंत्री असेल तर विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचा आणि उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, उपमुख्यमंत्रीपदासाठी जयंत पाटील यांचे नाव निश्चित झाल्याचे सुत्रांच्या हवाल्याने कळते.

पटेल म्हणाले, “उद्या होणाऱ्या शपथविधीच्या कार्यक्रमाची पूर्वतयारी, मंत्रीमंडळ आणि इतर संबंधीत विषयांवर चर्चा करण्यासाठी उद्ध ठाकरे, शरद पवार, अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे आणि तिन्ही पक्षांच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक आज पार पडली. या बैठकीत तिन्ही पक्षांचे मंत्रीमंडळात किती सदस्य असतील तसेच येणाऱ्या काळात महामंडळं, विधानपरिषद यांवर ज्या नियुक्त्या होतील या सर्व बाबींवर अंतिम चर्चा पूर्ण झाल्या आहेत.”

“उद्या होणाऱ्या शपथविधीप्रसंगी मुख्यमंत्र्यांसह आघाडीतील तिनही पक्षांचे एक किंवा दोन मंत्री शपथ घेतील. त्यानंतर ३० नोव्हेंबरपर्यंत विश्वासदर्शक ठरावासाठी राज्यपालांनी मुदत दिली आहे. या मुदतीत याची प्रक्रियाही पार पाडली जाईल. पुढे ३ डिसेंबरनंतर उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार हाईल,” असेही यावेळी पटेल यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2019 9:39 pm

Web Title: the deputy chief minister will be the ncp and the speaker of the assembly will be the congress aau 85
Next Stories
1 “उभा महाराष्ट्र तुमच्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहतोय”; अजितदादांच्या समर्थनार्थ झळकले पोस्टर्स
2 महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक संपली; खातेवाटपाचा फॉर्म्युला गुलदस्त्यात
3 भाजपा विरोधी बाकांवर; देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड
Just Now!
X