मालगुंड येथील केशवसुत स्मारकात शिल्पाची उभारणी
‘एक तुतारी द्या मज आणुनी, फुंकिन मी जी स्व प्राणाने, भेदुनी टाकीन सगळी गगने, दीर्घ जिच्या किंकाळीने’ या कवितेने मराठी कवितेला नवी ओळख देणारे तसेच आधुनिक मराठी कवितेचे जनक कवी केशवसुत यांची कवितेतील ‘तुतारी’ आता प्रत्यक्ष अवतरणार आहे. स्टेनलेस स्टीलच्या पत्र्यापासून तयार करण्यात आलेले हे १० फूट उंचीचे भव्य शिल्प ग्राफिक शैलीत असणार आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संकल्पनेतील ‘तुतारी’चे भव्य शिल्प ‘कोमसाप’ने मालगुंड येथे उभारलेल्या कवी केशवसुत स्मारकात उभारले जाणार आहे. प्रसिद्ध शिल्पकार विठोबा पांचाळ यांनी हे शिल्प तयार करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे.
कवी केशवसुत यांनी नव्या शिपायाचा बाणा पत्करला आणि त्यांच्या कवितांनी मराठी साहित्यात/कवितेत व्यक्तिस्वातंत्र्याची, समतेची, क्रांतीची आणि नव्या मनुची ‘तुतारी’ फुंकली. रूढी-परंपरा उखडून टाकणे आणि समानतेची वागणूक देणे हा आपल्या कवितेचाच धर्म आहे, असे मानले आणि मराठी कवितेला एक नवी ओळख मिळवून दिली. या युगप्रवर्तक कवीने आपल्या कवितेत ‘तुतारी’ हे प्रतीक वापरले त्याचे शिल्प ‘कोमसाप’च्या मालगुंड येथील केशवसुत स्मारकात उभारण्याचा निर्णय घेतला आहे. कवीने आपल्या कवितेत जे प्रतीक वापरले त्या प्रतीकाचे शिल्प तयार करण्याचा बहुधा हा पहिलाच प्रयोग असल्याचे ‘कोमसाप’च्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

आतापर्यंत मी फायबर, ब्रॉन्झ, प्लास्टर ऑफ पॅरिस अशा वेगवेगळ्या माध्यमांतून शिल्पे उभारली आहेत. ‘तुतारी’चे हे शिल्प स्टेनलेस स्टीलच्या पत्र्यापासून ग्राफिक स्वरूपात तयार करतो आहे. माझ्यासाठीही हे आव्हान आणि वेगळा प्रयोग आहे. खडकावर उभा असलेला माणूस ‘तुतारी’ फुंकतोय असे या शिल्पाचे स्वरूप आहे. या शिल्पाची प्रतिकृती (डमी) अल्युमिनिअमच्या पत्र्यापासून तयार केली असून ती मधु मंगेश कर्णिक यांना दाखविली आहे. या शिल्पाला त्यांनी मान्यता दिली असून आता लवकरच स्टेनलेस स्टीलच्या पत्र्यापासून हे भव्य शिल्प आपण तयार करणार आहोत.
-शिल्पकार विठोबा पांचाळ

navi mumbai, nerul, save Kandalvan protest, Cricket umpires, association, activate, environment, marathi news,
कांदळवन वाचवण्यासाठी क्रिकेट पंच संघटनाही सक्रिय, नेरुळच्या चाणक्य तलाव परिसरात आंदोलन
rbi commemorative coins
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ९० रुपयांचे नाणे लाँच, RBI ला ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गिफ्ट
gondwana supercontinent overview interesting facts about gondwana supercontinent
भूगोलाचा इतिहास : गोंडवाना के भुईया मा..
slums in Dharavi
धारावीतील बहुमजली झोपड्यांसाठी विकास नियंत्रण नियमावलीत विशेष तरतूद?