१७ वर्षीय तरुणीला प्रोफाइल घेण्यासाठी बोलावून आपण प्रसिद्ध कंपनीत जाहिरात प्रतिनिधी असल्याची बतावणी केली. प्रोफाइल घेण्यासाठी आलेल्या तरुणीला इमारतीच्या पाचव्या माळ्यावर नेऊन तिच्याशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार सीसीटीव्हीने चव्हाट्यावर आणला. हा प्रकार अंधेरीत घडला. ओशिवरा पोलिसांनी आरोपी विरोधात विनयभंग आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर सीसीटीव्हीत कैद आरोपीचा शोध सुरु आहे.

अंधेरी लोखंडवाला मार्केट, कामधेनू इमारतीच्या पाचव्या मजल्यावर हा घृणास्पद प्रकार घडला. १७ वर्षाची तरुणी अंधेरीत कुटुंबासह राहते. वडिलांचा मीरारोड येथे टूर्स आणि ट्रॅव्हलर्स व्यास असून तरुणी १२ वी कॉमर्समध्ये शिकत आहे. तिचा संपर्क ३० वर्षीय अज्ञात तरुणाशी आला. त्याने आपण प्रसिद्ध जाहिरात कंपनीत जाहिरात प्रतिनिधी असल्याची थाप मारली. आपण शितपेयाच्या जाहिरातीत काम करतो. तरुणाने तिची सर्वांगीण  माहिती मिळवली. मात्र तरुणीला उंची माहिती नव्हती म्हणून तिला उंची काढण्यासाठी त्याच्या कार्यालयात इमारतीच्या पाचव्या माळ्यावर आणले. कार्यालय बंद होते. त्यावेळी लंपट तरुणाने त्याच ठिकाणी तिची उंची घेण्याच्या बहाण्याने तिचा विनयभंग केला. या प्रकाराने ती घाबरली होती. तिने सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितलं. त्यानंतर ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली .

आता ओशिवरा पोलीस त्या अज्ञात रोडरोमियो लंपटाचा शोध सीसीटीव्हीच्या माध्यमातून घेत आहेत.