अंबरनाथ स्टेशनजवळ मालगाडीचे इंजिन बंद पडले आहे. थोड्याच वेळापूर्वी ही घटना घडली आहे. त्यामुळे कर्जत आणि बदलापूरकडून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक खोळंबली आहे. हे इंजिन हटवण्याचे काम सुरु आहे. मात्र जोपर्यंत हे इंजिन हटवले जाणार नाही तोपर्यंत मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबलेलीच राहणार आहे. कर्जत, बदलापूर या ठिकाणाहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. बदलापूरमधून मुंबईच्या दिशेने निघालेली एक ट्रेन बदलापूर-अंबरनाथ स्थानकांदरम्यान थांबवण्यात आली आहे. या घटनेला एक तास उलटूनही परिस्थिती जैसे थेच आहे. अनेक प्रवाशांनी जीव मुठीत धरून अंबरनाथ स्टेशन किंवा बदलापूर स्टेशन पर्यंत चालत जाण्याचा पर्याय निवडला आहे. मात्र ट्रेन जिथे थांबली आहे तिथून अंबरनाथ स्टेशनही जवळ नाही आणि बदलापूरही नाही. त्यामुळे अनेकांना पायपीट करतच स्टेशन गाठावे लागते आहे. इंजिन बंद पडण्याच्या घटनेला दीड तास उलटल्यानंतर हळूहळू लोकलची वाहतूक सुरु झाल्याची माहिती मिळते आहे.
एक तास उलटला, परिस्थिती जैसे थेच @Central_Railway @RidlrMUM @LoksattaLive pic.twitter.com/G81KH5PhKV
— Prathmesh Dixit (@PrathmeshDixit2) June 29, 2018
मध्य रेल्वे मार्गावर अशा समस्या नित्याच्याच झाल्या आहेत. गाड्या वेळेत नसणे, फास्ट लोकल्स उशिराने धावणे, लोकल्समधून प्रवासी पडणे या समस्यांना प्रवाशांना तोंड द्यावे लागतेच. फर्स्ट क्लासची अवस्थाही Worst class म्हणावा अशीच असते. अशा सगळ्या परिस्थितीत मुंबईकर जीव मुठीत धरून प्रवास करतात. आता अंबरनाथजवळ बंद पडलेले मालगाडीचे इंजिन जोपर्यंत हटवण्यात येत नाही तोपर्यंत कर्जत, बदलापूरकडून येणाऱ्या लोकल्सचा खोळंबा होणार आहे. प्रवाशांनी याबाबत संताप व्यक्त केल्याचे समजते आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 29, 2018 12:01 pm