“कर्नाटकचा प्रश्न हा केवळ कर्नाटकचा नसून, हा दोन राज्यांमधील सीमा प्रश्न आहे. हे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना कळालं पाहिजे. त्यांनी थोडा इतिहास समजून घेतला पाहिजे. कायद्याने काय व्हायचं ते होईलचं, पण आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत, हे सुद्धा कर्नाटकच्या सरकारने आता विसरू नये. या विषयावर ज्या पद्धतीनं पावलं टाकायला पाहिजेत, ती टाकायचला सुरूवात झालेली आहे. कुणी तिकडं काही बरळलं तरी इकडं आम्हाला फरक पडत नाही.” अशा शब्दांमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

“कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच”; सीमावादावरुन उद्धव ठाकरे आक्रमक

संजय राऊत म्हणाले, “काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं. तेव्हा त्यांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व अन्य नेते होते. कर्नाटकचा प्रश्न हा केवळ कर्नाटकचा नसून, हा दोन राज्यांमधील सीमा प्रश्न आहे. हे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना कळालं पाहिजे. त्यांनी थोडा इतिहास समजून घेतला पाहिजे.”

महाराष्ट्र सीमावासीयांच्या पाठीशी!

तसेच, “मुंबई, महाराष्ट्रात जे आमचे कानडी बांधव राहतात, आम्ही त्यांच्यावर कुठलीही सक्ती केलेली नाही. त्यांना संपूर्ण स्वातंत्र्या आहे. इथं कानडी शाळा आम्ही चालवतो. आम्ही कानडी शाळांना अनुदान देतो. इथं अनेक कानडी संस्था देखील चालवल्या जातात. पण बेळगाव सारख्या भागात ही परिस्थिती आहे का? ही लढाई कशासाठी आहे? ही लढाई आपली भाषा आपली संस्कृती टिकवण्यासाठी आहे. आम्ही काय देशाच्या बाहेर जा असं कधी कुणाला म्हणत नाही.” असं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं.

सीमावादावर हे शेवटचं हत्यार, आपण अंतिम पर्वाच्या दिशेने – शरद पवार

“कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी एकदा मुंबईत, महाराष्ट्रात यावं आणि त्यांच्या कानडी बांधवांशी चर्चा करावी. इथं ते उद्योग क्षेत्र, हॉटेल क्षेत्रात जे कामं करतात, हे सर्वजण आमचेच आहेत. उद्या त्यांच जर मतदान घेतलं इथं, तर ते देखील सांगतील की बेळगाव महाराष्ट्रातचं आलं पाहिजे.” असं देखील राऊत यांनी यावेळी बोलून दाखवलं.

याचबरोबर “अनेक वर्षांपासून कर्नाटकचे काही नेते अशाप्रकारचं राजकारण करत आहे. परंतु, कायद्याने काय व्हायचं ते होईलचं, पण आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत, हे सुद्धा कर्नाटकच्या सरकारने आता विसरू नये. कालची बैठक ही निर्णायक बैठक होती, एवढचं मी सांगतो. या विषयावर ज्या पद्धतीनं पावलं टाकायला पाहिजेत, ती टाकायचला सुरूवात झालेली आहे. कुणी तिकडं काही बरळलं तरी इकडं आम्हाला फरक पडत नाही.” असा इशारा देखील संजय राऊत यांनी कर्नाटक सरकारला यावेळी दिला.