News Flash

शनिवारी शेवटची गाडी ११.३ ० वाजता

मेगाब्लॉकला सरावलेल्या मुंबईकरांना शनिवारी रात्रीही एका मोठय़ा विशेष ब्लॉकला सामोरे जावे लागणार आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

कुल्र्याजवळील पूल बांधण्यासाठी विशेष ब्लॉक
रविवारच्या मेगाब्लॉकला सरावलेल्या मुंबईकरांना शनिवारी रात्रीही एका मोठय़ा विशेष ब्लॉकला सामोरे जावे लागणार आहे. कुल्र्याजवळील पादचारी पुलाचे गर्डर टाकण्याचे काम करण्यासाठी शनिवारी रात्री पाच तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार असून या ब्लॉकमुळे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून शेवटची गाडी रात्री ११.३० वाजता कर्जतसाठी रवाना होणार आहे.
कुल्र्याजवळील या पुलाचे काम करण्यासाठी तसेच वडाळ्याजवळ हार्बर मार्गावर काम करण्यासाठी शनिवारी रात्री पाच-पाच तासांचे विशेष ब्लॉक घेण्यात येत आहेत. या ब्लॉकमुळे मुख्य मार्गावरील अप-डाऊन धिम्या मार्गावरील वाहतूक मध्यरात्री १२.२० ते पहाटे ४.२० या वेळेत बंद राहील. अप-डाऊन जलद मार्गावरील वाहतूक ११.४५ ते ५.१५ या वेळेत पूर्णपणे बंद असेल. या दरम्यान अप-डाऊन हार्बर मार्गिका रात्री ११.४५ ते सकाळी ७.४५ या वेळेत बंद राहील.
या ब्लॉकमुळे काही गाडय़ा रद्द करण्यात आल्या असून काहींच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

मुख्य मार्ग
* मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून शेवटची गाडी रात्री ११.३० वाजता कर्जतसाठी रवाना होईल. ही गाडी कुल्र्याहून ११.५८ ला सुटेल.
* त्यानंतर मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सुटणाऱ्या अंबरनाथ (११.५२), कसारा (१२.१०) आणि कर्जत (१२.३०) या गाडय़ा कुल्र्याहून रवाना केल्या जातील.
* मुंबईकडे येणारी शेवटची गाडी कुल्र्याहून ११.५६ वाजता रवाना होणार आहे.
* मुंबईहून सकाळी पहिली गाडी कसाऱ्याला ४.१२ वाजता सुटेल.
* मुंबईच्या दिशेने येणारी पहिली गाडी मुंबईला ४.५८ वाजता पोहोचेल.

हार्बर मार्ग
* हार्बर मार्गावरील शेवटची गाडी पनवेलच्या दिशेने मुंबईहून रात्री ११.०० वाजता निघेल. ही गाडी कुल्र्याला ११.२८ वाजता पोहोचेल.
* हार्बर मार्गावरून मुंबईला येणारी शेवटची गाडी शनिवारी मुंबईला १०.५५ वाजता पोहोचेल.
* पनवेलच्या दिशेने पहिली गाडी रविवारी सकाळी ८.०५ वाजता निघणार आहे.
* मुंबईच्या दिशेने पहिली गाडी रविवारी सकाळी पनवेलहून सकाळी ७.०८ वाजता सुटेल.

अंधेरी-सीएसटी
* अंधेरी व वांद्रे यांसाठी अनुक्रमे ११.०७ आणि ११.२३ वाजता शेवटच्या गाडय़ा मुंबईहून रवाना होतील.
* तर अंधेरीहून मुंबईला येणारी शेवटची गाडी अंधेरीहून ११.५६ ला रवाना होऊन मुंबईला १२.३८ वाजता पोहोचेल.
* रविवारी अंधेरीकडे जाण्यासाठी पहिली गाडी मुंबईहून ५.१२ वाजता सुटेल.
* मुंबईकडे येणारी पहिली गाडी वांद्रय़ाहून ४.५३ वाजता आणि अंधेरीहून ६.०५ वाजता रवाना होईल.

वेळापत्रकात बदल
* मुंबईहून रात्री १२.१० वाजता सुटणारी मुंबई-वाराणसी महानगरी एक्स्प्रेस रविवारी पहाटे ४.०० वाजता रवाना होईल.
* मुंबईहून रविवारी सकाळी ७.१० वाजता निघणारी मुंबई-मडगाव मांडवी एक्स्प्रेस सकाळी ८.२५ वाजता निघेल.
* मुंबई-बेंगळुरू उद्यान एक्स्प्रेस ही गाडी रविवारी सकाळी ८.०५ वाजता सुटण्याऐवजी सकाळी ९.०५ वाजता सुटेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2015 3:41 am

Web Title: the last train on saturday at 11 30 pm
Next Stories
1 मुंबई.. १५.६ अंश सेल्सिअस!
2 विद्याधरखेरीज आणखी एकाचा हात?
3 स्मार्ट सिटीला लाल गालिचा ‘स्वच्छ भारत’ अडगळीत
Just Now!
X