मुंबईतील तिसऱ्या सेरो सर्वेक्षणातही शिक्कामोर्तब

मुंबई : मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या सेरो सर्वेक्षणातही महिलांमध्ये प्रतिपिंडांचे (अ‍ॅण्टीबॉडीज) प्रमाण पुरुषांच्या तुलनेत अधिक असल्याचे आढळून आले आहे. महिलांमध्ये करोनाविषयक प्रतिकारशक्ती अधिक असल्याचे यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसारही सध्या बाधित असलेल्यांमध्ये बाधित महिलांचे प्रमाण हे सरासरी ४५ टक्के  आहे.

करोना आजाराशी लढणाऱ्या प्रतिपिंडांचे रक्तातील प्रमाण किती आहे हे ठरवण्यासाठी मुंबईत आतापर्यंत तीनदा सेरो सर्वेक्षण करण्यात आले आहे. यातील  पहिले सेरो चाचणी सर्वेक्षण तीन विभागात जुलै २०२० मध्ये करण्यात आले होते. तर दुसरे सेरो सर्वेक्षण हे त्याच तीन विभागात ऑगस्ट २०२० मध्ये करण्यात आले होते. त्यानंतर आता मार्च २०२१ मध्ये सर्व २४ विभागांत सेरो सर्वेक्षणाचे करण्यात आले. या तीनही सर्वेक्षणात झोपटपट्टीतील रहिवासी, इमारतीतील रहिवासी आणि पुरुष व स्त्रिया यांच्यातील प्रतिपिंडांचे प्रमाण तपासण्यात आले होते. या तीनही सर्वेक्षणात दोन गोष्टी अधोरेखित झाल्या आहेत. त्या म्हणजे पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक सकारात्मकता आढळून आली आहे. तसेच झोपडपट्टीतील नागरिकांमध्येही हे प्रमाण इमारतीतील नागरिकांपेक्षा अधिक होते.

मुंबईतील  बाधितांमध्ये महिला आणि पुरुषांचा विचार के ला असता महिलांचे सरासरी प्रमाण कमी आहे. बाधितांमध्ये ५८ टक्के  पुरुष तर ४१ टक्के  महिला आहेत. त्यातही के वळ ४० ते ५० या वयोगटात सर्वाधिक  ६५ टक्के  महिला असून या वर्गातील महिला या कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या, नोकरदार, अत्यावश्यक सेवेतील महिला आहेत.

यावेळच्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष

पुरुषांमध्ये प्रतिपिंडे – ३५.०२ टक्के

महिलांमध्ये प्रतिपिंडे   – ३७.१२ टक्के