30 September 2020

News Flash

“पायाभूत सुविधांचा निर्धार कायम ठेवल्यास ५ ट्रिलिअन अर्थव्यवस्थेत राज्याचा मोठा वाटा असेल”

भूसंपादन करताना अनेक पटींनी देण्यात येणाऱ्या किंमतीमुळे पायाभूत सुविधांची किंमत वाढते. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य किंमत द्यायलाच हवी पण त्याबद्दल ठराविक नियम असावेत.

मुंबई : लोकसत्ता’च्या वतीने आयोजित ‘अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र’ या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्य सचिव भूषण गगराणी.

सर्व पायाभूत सुविधांची किंमत अनेक पटींने वाढत आहे. यामागे भूसंपादन करताना अनेक पटींनी देण्यात येणारी किंमत हे महत्वाचे कारण आहे. शेतकऱ्यांना योग्य किंमत द्यायलाच हवी पण त्याबद्दल ठराविक नियम असावेत. पायाभूत सुविधांची निविदा काढण्यापेक्षा निविदा रद्द करणे जास्त कठीण असते. प्रत्येक प्रकल्पाला वाजवी अवाजवी कारणामुळे स्थगिती दिली जाते आणि त्यामुळे प्रकल्पाचा खर्च वाढत जातो. मात्र, निर्धार कायम ठेवला तर पायाभूत सुविधांमध्ये मोठे काम शक्य आहे. या कामांच्या माध्यमातून देशाच्या तीन ट्रिलियन आणि पाच ट्रिलियन इकनॉमिमध्ये महाराष्ट्राचा नक्कीच मोठा वाटा असेल, असे मत मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी म्हटले आहे. ‘पायाभूत सुविधांचे वित्तीय व्यवस्थापन’ या विषयावर लोकसत्ता अॅडव्हान्टेज महाराष्ट्र परिषदेत ते बोलत होते.

गगराणी म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल्या ‘वॉररुम’मध्ये नवी मुंबई विमानतळाबाबत १२ परवानग्या एका रात्रीमध्ये मिळवल्या. प्रकल्प करायचा तर त्यामागे अशा प्रकारे राजकीय इच्छाशक्ती हवी. राज्यातील सर्व मुख्य प्रकल्पांसाठीचे आर्थिक नियोजन झाले आहे. राज्यांची महत्वाची महामंडळं अत्यंत सक्षम आहेत. त्यांना हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कर्ज घ्यावी लागत नाहीत. घेतलेले कर्ज हे उत्पादक कामांसाठी कसं वापरता येईल हे पाहणं अधिक महत्वाचं असतं. ४ लाख १२ हजार कोटींचे कर्ज महाराष्ट्राने पायाभूत सुविधांसाठी घेतले आहे. मात्र, जीडीपीच्या टक्केवारीत १२ टक्के ते १३ टक्क्यांपर्यंत आहे. कुठल्याही प्रगतशील अर्थव्यस्थेमध्ये इतके कर्ज अधिक नसते, असे यावेळी गगराणी म्हणाले.

पायाभूत सुविधा वाढल्यानंतर त्या परिसरामध्ये लोकसंख्या वाढते आणि बकाल पद्धतीने शहरांची वाढ होते. मात्र, यासाठीही सरकारने उपाययोजना केली असून शहरांची सुनियोजित वाढ होण्यासाठी काळजी घेतली आहे. मुंबईहून पुण्याला अगदी २० मिनिटांमध्ये पोहचता येईल अशी ‘हायपरलूप’ सेवा सुरु करण्याचे काम सरकारने हाती घेतले आहे. सध्या ही सेवा केवळ अमेरिकेमध्ये कार्यरत आहे. मुंबई-पुण्यासारख्या दोन अर्थव्यवस्था २० मिनिटांच्या अंतरावर आल्यावर त्याचा अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होईल, अशी भुमिका यावेळी भूषण गगराणी यांनी मांडली.

आपल्याकडे सर्व प्रकल्पांना आधी विरोध होतो. ‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’ला देखील विरोध झाला होता, जायकवाडी धरण प्रकल्पालाही विरोध झाला होता. त्या त्या वेळी या प्रकल्पांना विरोध झाला मात्र नंतर त्यांचा फायदा दिसून आला. एमएमआरमध्ये सध्या ३ लाख ५० हजार कोटींचे प्रकल्प सुरु आहेत. तर महाराष्ट्राचा विचार करता ११ लाख कोटींचे प्रकल्प एकाच वेळी सुरु झाले आहेत. यासाठी सरकारने पैसे उभारले आहेत. महाराष्ट्रामध्ये अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांनी या प्रकल्पांचे चांगले वित्तिय व्यवस्थापन केले आहे याचा आनंद असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

‘लोकसत्ता’च्या वतीने ‘अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमांतर्गत राज्याच्या सर्वागीण विकासासाठी महत्त्वाच्या असलेल्या पायाभूत सुविधा क्षेत्राच्या विकासाची सद्य:स्थिती आणि प्रगतीची दिशा यांचा वेध घेतला जात आहे. या सत्रात मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्यासह पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सरकारी उपक्रमांचे वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञ सहभागी आहेत.

‘अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत कृषी, पायाभूत सुविधा आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये गेल्या पाच वर्षांत झालेल्या प्रगतीचा ऊहापोह केला जात आहे. विविध क्षेत्रांमधील तज्ज्ञ या कार्यक्रमात आपली भूमिका मांडत आहेत. राज्यातील पायाभूत सुविधा विकासांची दिशा, महानगरांचे व त्याच्या परिघावरील प्रदेशाचे नियोजन यावर यात विचारमंथन केलं जात आहे.

प्रायोजक..
लोकसत्ता अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र या उपक्रमाला माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, एसआरए, एमआयडीसी, एमएमआरडीए, सिडको, एमएसआरडीसी, म्हाडा यांचे सहकार्य लाभले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 26, 2019 4:32 pm

Web Title: the maharashtra will have a big role in the trillion economy if infrastructure is sustained says bhushan gagarani aau 85
Next Stories
1 संजय दत्त रासपात येणार असे कधीच म्हणालो नाही – जानकर
2 विरोधी पक्षांची अवस्था बुद्धू पोरांसारखी, पुढची २५ वर्ष आम्हीच सत्तेत राहणार – मुख्यमंत्री
3 ५० कोटीत मंत्रिपद घेतल्याच्या आरोपावर जयदत्त क्षीरसागरांचे उत्तर, म्हणाले…
Just Now!
X