प्राणिसंग्रहालयातील माहितीसोबतच वनविश्वावर व्याख्यान; मुलाखतींचे आयोजन

मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेत भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयालाही (राणीची बाग) टाळे लागले; परंतु पर्यटकांना घरबसल्या राणीबागेतील विविधतेचा अनुभव घेता यावा यासाठी प्राणिसंग्रहालय प्रशासनाने ऑनलाइन माध्यमाचा आधार घेत समाजमाध्यमांवर ‘द मुंबई झू’ या नावाने पेज सुरू केले आहे. याअंतर्गत प्राणिसंग्रहालयातील प्राणी, पक्ष्यांची माहिती, विविध छायाचित्रे, चित्रफिती तसेच वनविश्वावर व्याख्यान आणि मुलाखतींच्या माध्यमातून राणीची बाग घराघरांत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

New Year Welcome Kalyan,
कल्याण, डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रांचा उत्साह; ढोल ताशांचा गजर, कलाकारांची उपस्थिती
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
winners of patra chawl
पत्राचाळीतील ३०६ विजेत्यांची घरांची प्रतीक्षा संपेना, भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्याने ताबा प्रक्रियेस विलंब
documentry article lokrang marathi news, lokrang article marathi
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : वन्यजीवांवरील रोमांचक प्रकल्प

राणीच्या बागेत प्रवेश करताच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय, ‘द मुंबई झू’ या नावाचा मोठा फलक दिसतो. ‘द मुंबई झू’ ही राणीच्या बागेची नवी ओळख आता समाजमाध्यमांवरही पाहायला मिळत आहे. बागेतील विविध प्राणी-पक्ष्यांचा दिनक्रम, दिवसभरात घडणारे गमतीशीर किस्से यांचे छायाचित्र, चित्रफिती या पेजवर पोस्ट केले जातात. प्राणी आणि वनस्पती प्रजातींची माहिती, त्याचा इतिहास यांचेही विश्लेषण केले जाते. तसेच दिन विशेषाचे औचित्य साधून अभ्यासकांसोबत चर्चा, मुलाखती यांचे आयोजनही केले जात आहे.

नुकत्याच झालेल्या मातृदिनी राणीच्या बागेतील आई-मुलाचे नाते असलेल्या पाणघोडय़ांची चित्रफीत पोस्ट करण्यात आली. यात आईचे नाव ‘शिल्पा’, तर तिच्या मुलाचे नाव ‘गणपत’ असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या नात्याला ऑनलाइन  पर्यटकांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे, तर जागतिक पक्षी स्थलांतर दिनानिमित्त ‘पक्ष्यांप्रमाणे गा, उडा-उंच विहार करा’ ही संकल्पना घेण्यात आली होती. याअंतर्गत पक्ष्यांच्या स्वभावातील सकारात्मकता मानवी जीवनात आचरण्याचा संदेश देण्यात आला. तसेच दरवर्षी राज्यात आढळणाऱ्या काही स्थलांतरित पक्ष्यांची छायाचित्र पोस्ट केली होती.

‘कोळी वाचवा दिना’निमित्त १४ मार्च रोजी कोळी अभ्यासक राजेश सानप यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, तर ‘सेन्ट्रल झू ऑथोरिटी’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘भारताचा अमृत महोत्सव’ या ऑनलाइन उपक्रमाची सुरुवातही प्राणिसंग्रहालयाच्या या व्यासपीठावरून करण्यात आली. यामध्ये हत्ती अभ्यासक आनंद शिंदे यांनी ‘एक संवाद हत्तींसोबत’ या विषयावर मार्गदर्शन केले, तर डॉ. प्राची मेहता यांनी ‘हत्ती-संघर्ष आणि संवर्धन’ या विषयावर व्याख्यान दिले. त्यामुळे सध्या राणीची बाग बंद असली तरी निसर्ग आणि प्राणिप्रेमींना घरबसल्या बागेचे दर्शन घडत आहे.

या उपक्रमाला १५ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आणि दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे. राणीच्या बागेला असलेला १६० वर्षांचा इतिहास, तेथील जैवविविधता लोकांपर्यंत पोहोचायला हवी. राणीची बाग म्हणजे केवळ प्राणी नव्हे तर त्यापलीकडे याला मोठी ओळख आहे. इतिहासातील वास्तू, प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासासाठी के लेले प्रयत्न आणि जगभरातील वनस्पती, झाडे, अभ्यासण्याचे हे शैक्षणिक केंद्र आहे. त्याची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.

– अभिषेक साटम, जीवशास्त्रज्ञ, वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय