16 November 2019

News Flash

…म्हणून पुलांच्या पुनर्बांधणी व दुरुस्तीचे सर्व अधिकार पालिका आयुक्तांना

व्हिजेटीआय च्या ".काँक्रिट ओव्हर ले" तंत्रज्ञानाचा वापर करुन दुरुस्तीचे काम करणार

संग्रहीत छायाचित्र

प्रशाकीसय पध्दत सोपी व जलद व्हावी म्हणून आपत्कालीन पद्धतीनुसार पुलांच्या, पुनर्बांधणी व दुरुस्तीचे सर्व अधिकार पालिका आयुक्तांना देण्यात आले तसेच व्हिजेटीआय च्या “.काँक्रिट ओव्हर ले” तंत्रज्ञानाचा वापर करुन पुलांच्या दुरुस्तीचे काम महिनाभरात करण्यात यावे अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

मुंबईतील २९ पूल दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासोबतच रेल्वेनेही १९९ पादचारी पूल आणि वाहतूकीच्या पूलांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. यामुळे पावसाळ्यात मुंबईत वाहतूक कोंडींंचा त्रास सहन करावा लागेल याबाबत मुंबईकरांच्या मनात चिंतेचे वातावरण आहे. म्हणून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची संयुक्त बैठक बोलवावी, अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केली होती. त्यानुसार बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी संयुक्त बैठक बोलावली होती.

या बैठकीच्या शिष्टमंडळामधे मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार, खा. गोपाळ शेट्टी, आ. राज पुरोहित, आ. अमित साटम आदी सहभागी होते. बैठकीला मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, महापालिका आयुक्त प्रविण परदेशी, मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे, वाहतूक शाखेचे आयुक्त, तसेच एमएमआरडीएचे आयुक्त आर.ए राजिव, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे, दोन्ही रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार गुप्ता, तसेच अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते. संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले ज्यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊ शकेल व पूलांच्या पुनर्बांधणी व दुरुस्तीचे काम वेग घेऊ शकेल.

First Published on June 12, 2019 9:05 pm

Web Title: the municipal commissioners have all the right to rebuild and repair the bridge msr 87