05 June 2020

News Flash

मनसेच्या इंजिनाला नवे इंधन!

राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या दहा महापालिकांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षात नव्याने संघटनात्मक नियुक्त्या केल्या असून...

| August 16, 2015 12:51 pm

राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या दहा महापालिकांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षात नव्याने संघटनात्मक नियुक्त्या केल्या असून प्रथमच नऊजणांची नेतेपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यव्यापी असलेल्या मनसेसाठी तब्बल सातजणांची प्रवक्ते म्हणून नियुक्ती करताना आगामी निवडणुकांसाठी प्रचाराच्या तोफा सज्ज केल्याचे संकेत दिले आहेत.लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मनसेचे पानिपत झाल्यानंतर एकप्रकारे मरगळ आली होती. त्यातच पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व राज ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यांपासून मौनात असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरु झाली होती. या पाश्र्वभूमीवर ठाण्यात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज्यातील भाजपच्या भ्रष्ट कारभारावर टीका करून आगामी काळात आपली वाटचाल कशी असेल ते राज यांनी स्पष्ट केले. शिवसेनेबरोबरही आपले कोणतेही साटेलोटे नाही तसेच आगामी काळातही असणार नाही, हे स्पष्ट केल्यामुळे मनसेचे ‘एकला चलो रे’ धोरण कायम असेल हे राज यांनी स्पष्ट केले आहे. बाळा नांदगावकर, दिपक पायगुडे, अनिल शिदोरे, शिशिर शिंदे, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, शिरिष सावंत, संजय चित्रे आणि जयप्रकाश बावीसकर यांची नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मंगेश सांगळे, प्रकाश भोईर, आदित्य शिरोडकर, संजय घाडी, मनोज चव्हाण, परशुराम उपरकर, प्रमोद पाटील, बाबा जाधव आणि हेमंत गडकरी यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या शिवाय २० उपाध्यक्ष, पाच महिला उपाध्यक्षांची निवड जाहीर करण्यात आली असून प्रवक्तेपदासाठी सातजणांची निवड करण्यात आली आहे. यातील अनिल शिदोरे वगळता सर्व प्रवक्ते हे मुंबईतील असून नव्याने नियुक्ती करण्यात आलेले बहुतेक  मुंबई, पुणे, नाशिक येथील असल्यामुळे मराठवाडा-विदर्भातील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2015 12:51 pm

Web Title: the new fuel engine of mns
टॅग Mns
Next Stories
1 नवा ‘तहलका’: मासिकाच्या मुखपृष्ठावर दहशतवाद्यांच्या रांगेत बाळासाहेब ठाकरे!
2 मुंबईत वर्षभरात सीसीटीव्हीचे जाळे
3 सागरी सुरक्षा यंत्रणा उथळ
Just Now!
X