25 September 2020

News Flash

नव्या धोरणात शाळा, रुग्णालयांवर मोबाइल टॉवर उभारण्यास बंदी

मुंबईत मोठय़ा संख्येने अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या मोबाइल टॉवरना वेसण घालण्यासाठी महापालिकेने नवे धोरण निश्चित केले आहे.

| January 24, 2014 12:02 pm

मुंबईत मोठय़ा संख्येने अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या मोबाइल टॉवरना वेसण घालण्यासाठी महापालिकेने नवे धोरण निश्चित केले आहे. या धोरणाला मंजुरी मिळाल्यानंतर  एका इमारतीवर केवळ एकच टॉवर उभारता येणार आहे. त्याचबरोबर रुग्णालय, शाळा, महाविद्यालयाच्या इमारतींवर मोबाइल टॉवर उभारता येणार नाहीत. मंजुरीसाठी हे धोरण सुधार समितीच्या येत्या बैठकीत सादर करण्यात येणार आहे. बक्कळ पैसे देण्याचे आमिष दाखवून अनेक कंपन्यांनी इमारतींवर एकाहून अधिक मोबाइल टॉवर उभारले आहेत. यापैकी बहुसंख्य मोबाइल टॉवर अनधिकृत असल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. आता पालिकेने मोबाइल टॉवरबाबत धोरण तयार केले असून त्याला राज्य सरकारनेही हिरवा कंदिल दाखविला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2014 12:02 pm

Web Title: the new policy schools hospitals ban on the setting up mobile towers
Next Stories
1 सरकारी योजनेतील गरिबांची तीन हजार घरे हडप
2 केजरीवालांपेक्षा राखी सावंतने उत्तम राज्य केले असते – शिवसेना
3 रेल्वे सोडा नि बसने जा!
Just Now!
X