छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पूल कोसळला या घटनेत २० पेक्षा जास्त लोक जखमी झाले. या पुलाचं ऑडिटच झालं नव्हतं असा आरोप आता करण्यात येतो आहे. मात्र या पुलाचं ऑडिट झालं होतं आणि पुलाच्या डागडुजीचा प्रस्ताव होता ती करण्यात येणार होती मात्र ही दुर्घटना घडली अशी माहिती अशी माहिती शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे.  हा पूल सुमारे १०० वर्षांपेक्षा जास्त काळ जुना आहे मात्र या पुलाचं ऑडिट झालं नव्हतं असा आरोप आता होतो आहे. मात्र या आरोपात काही तथ्य नाही असं सावंत यांनी म्हटलं आहे. या पुलाच्या फक्त डागडुजी करण्याचा प्रस्ताव होता आणि ती आम्ही करणारच होतो. हा पूल रेल्वेचा असला तरीही डागडुजीची जबाबदारी महापालिकेकडे होती असंही सावंत यांनी म्हटलं आहे.  गर्दीच्या वेळी ही दुर्घटना घडली आहे. या घटनेमध्ये २ जण ठार झाले आहेत अशीही माहिती आता मिळते आहे.

लोअर परळ येथे पूल कोसळून दुर्घटना घडली होती. त्या घटनेत २० पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला होता. त्यानंतर मुंबईतल्या धोकादायक पुलांच्या यादीत या पुलाचा समावेश झालेलाच नव्हता अशी गंभीर माहिती समोर आली होती. मात्र या माहितीत तथ्य नसल्याचं सावंत यांनी म्हटलं आहे.  पूल फक्त डागडुजी करण्याचा प्रस्ताव होता ही माहिती ज्या कोणी दिली त्या अधिकाऱ्यावर कारवाई होईल असेही अरविंद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ हा पादचारी पूल होता. या ठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. तसेच ढिगारा उपसण्याचं कामही आता सुरु करण्यात आलं आहे. या घटनेत जे जखमी झाले आहेत त्यांना कामा रूग्णालय, जीटी रूग्णालय, सायन रूग्णालय या ठिकाणी दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी एकूण तिघांची प्रकृती गंभीर आहे असंही समजतं आहे.