सनदी अधिकाऱ्यांच्या वास्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ओशिवरा येथील मीरा टॉवर या इमारतीतील एका सदनिकेमध्ये चालणारे सेक्स रॅकेट पोलिसांनी गुरुवारी उघडकीस आणले. आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांच्या या इमारतीत रात्री नऊच्या सुमारास बनावट ग्राहक पाठवून केलेल्या कारवाईत पाच वेश्यांना अटक केली. या तरुणी मालिकांमधून कामे करणाऱ्या पाच मॉडेल्स असल्याचे समजते. या वेश्यांबरोबरच एका खासगी कंपनीचा व्यवस्थापक व दलाल या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. मीरा टॉवर या इमारतीतील बी विंगमधील १४०२ क्रमांकाची ही सदनिका एका व्यावसायिक महिलेच्या नावावर आहे. या महिलेने पुण्यातील सॉफ्टकॉन सिस्टिम प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या एका खासगी कंपनीला ती भाडय़ाने दिली होती. या कंपनीचा व्यवस्थापक इम्तियाझ शेख या सदनिकेमध्ये हे रॅकेट चालवत असल्याची माहिती समोर येत आहे. ही सदनिका ‘गेस्ट हाऊस’प्रमाणे वापरली जात होती. त्यासाठी पाच हजार रुपये घेतले जात होते, असे सूत्रांनी सांगितले.

Supreme Court Verdict on Same-Sex Marriage in India
Same-Sex Marriage Verdict: समलिंगी विवाहाची याचिका ३ विरुद्ध २ मतांनी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; वाचा काय म्हटलं निकालात!
सहाव्या इयत्तेतील मुलावर तरुणीकडे सेक्स चॅटची मागणी केल्याचा आरोप
‘सेक्स रॅकेट’ उघड झाल्यामुळे सनदी अधिकारीही अस्वस्थ