07 August 2020

News Flash

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण : आदित्य चोप्रांचा जबाब मुंबई पोलिसांनी नोंदवला

१४ जून रोजी सुशांतने केली आत्महत्या

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी आता मुंबई पोलिसांनी यशराजचे आदित्य चोप्रा यांचा जबाब नोंदवला आहे. याप्रकरणी काही प्रश्न मुंबई पोलिसांनी आदित्य चोप्रा यांना विचारला आहे. मुंबई पोलिसांनी यासंदर्भातली माहिती ट्विट करुन दिली आहे. १४ जून रोजी मुंबई येथील राहत्या घरात अभिनेता सुशांत सिंह राजपूतने गळफास लावून घेत आत्महत्या केली. या प्रकरणी आता आदित्य चोप्रा यांची आज चौकशी करण्यात आली.

सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर सगळं बॉलिवूड हळहळलं. मात्र या प्रकरणात दोन आरोप होऊ लागले. काही कलाकारांनी मात्र सुशांत सिंह हा घराणेशाही, गटबाजीचा बळी आहे असा आरोप झाला. कंगना रणौतने या प्रकरणी सर्वात आधी आरोप केला आहे. मानसिक लिंचिंगमुळे सुशांतचा बळी गेला अशी भूमिका कंगनाने घेतली आहे. त्यानंतर या प्रकरणात महाराष्ट्राच्या गृहखात्यानेही लक्ष घातलं. मुंबई पोलिसांनी आत्तापर्यंत या प्रकरणात ३० पेक्षा जास्त जणांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2020 2:21 pm

Web Title: the statement of aditya chopra of yash raj films recorded in sushant singh rajput death case scj 81
Next Stories
1 “पद्मश्री पुरस्कार परत करेन, जर सुशांत…” कंगना रणौतचे खळबळजनक विधान
2 नेपाळच्या पंतप्रधानांच्या प्रभू रामचंद्रांवरच्या दाव्याने टीव्हीवरची ‘सीता’ही चकित, पोस्ट केला फोटो
3 प्रदर्शनाच्या पाच वर्षानंतरही जपानच्या चित्रपटगृहांमध्ये दाखवला जातोय सलमानचा ‘हा’ चित्रपट
Just Now!
X