News Flash

..तर शिक्षणसेवक योजना लागू नाही

विनाअनुदानित विभागातील मान्यताप्राप्त शिक्षकाची सेवा १०० टक्के अनुदानावर असलेल्या शाळेत बदलीने वर्ग केल्यास त्यांना शिक्षणसेवक योजना लागू होत नसल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

| September 27, 2014 05:40 am

विनाअनुदानित विभागातील मान्यताप्राप्त शिक्षकाची सेवा १०० टक्के अनुदानावर असलेल्या शाळेत बदलीने वर्ग केल्यास त्यांना शिक्षणसेवक योजना लागू होत नसल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
शिक्षणसेवक योजना केवळ १०० टक्के अनुदानित शाळांसाठीच लागू असून अंशत: अनुदानित व विनाअनुदानित शाळांना शिक्षणसेवक योजना लागू नाही. सेवानिवृत्ती अथवा अन्य कारणामुळे १०० टक्के अनुदानावरील शिक्षकाचे पद रिक्त झाल्यास विनाअनुदान तत्त्वावर काम करणाऱ्या मान्यताप्राप्त शिक्षकाची बदली १०० टक्के अनुदानावर केल्यास अशा शिक्षकांना नियमित वेतनश्रेणीत मान्यता देण्याऐवजी त्यांना पुन्हा तीन वर्षे शिक्षणसेवक म्हणून मानधनावर मान्यता दिली जाते.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील अशोक काळे व संगीत राणे या सेवेत कायम असलेल्या शिक्षकांच्या बदल्या अनुदानित विभागात केल्यानंतर त्यांना नियमित वेतनश्रेणीत मान्यता देण्याऐवजी शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग, सिंधुदुर्ग यांनी शिक्षणसेवक म्हणून मान्यता दिली. सदरची मान्यता अन्यायकारक असल्याने कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार रामनाथ मोते यांनी नियमित वेतन श्रेणीत मान्यता देण्याची विनंती केली होती. तथापि शिक्षण विभागाने आ. मोते यांची मागणी अमान्य करून संबंधित वेतनश्रेणीत मान्यता देण्यास नकार दिला, म्हणून मोते यांनी अ‍ॅड. नरेंद्र बांदिवडेकर यांच्या वतीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर १७ सप्टेंबरला अंतिम सुनावणी होऊन शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचा आदेश रद्द करून संबंधित शिक्षकांची विनाअनुदानित विभागाकडून अनुदानित विभागाकडे बदली केली असल्याने त्यांना बदली आदेशाच्या दिनांकापासून अनुदानित विभागात वेतनश्रेणीत मान्यता देण्याचे आदेश दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 5:40 am

Web Title: the teacher facilitator scheme not applicable
Next Stories
1 ४२ लाख रुपयांचा तिकीट गैरव्यवहार उघडकीस
2 कोकणवासीयांसाठी दसऱ्यानिमित्त विशेष गाडय़ा
3 रेल्वेमार्गावर गोंधळच गोंधळ!
Just Now!
X