23 September 2020

News Flash

मुंबईकडे जाणारी वाहतूक रोखली; पुणे आणि नाशिककडून येणारी वाहने टोल नाक्यांवर थांबवली

महामार्ग पोलिसांचा निर्णय

पुणे : एक्सप्रेस वे वर वाहतुक रोखण्यात आल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहराची यंत्रणा कोलमडून पडली आहे. या पार्श्वभूमीवर बाहेरील वाहनांना आणि लोकांना मुंबईत प्रवेश रोखण्यात आला आहे. संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग तसेच जुना पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुक खालापूर टोल नाक्याजवळ रोखण्यात आली आहे. तर दुसरीकडे नाशिक-मुंबई महामार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतुक घोटी टोलनाक्याजवळ रोखण्यात आली आहे. महामार्ग पोलिसांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक कुसगाव आणि उर्से टोलनाक्यावर थांबवण्यात आली आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना पुणे-मुंबई महामार्ग  अर्थात एन. एच. ४ मार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहने थांबवण्यात आल्याने मुंबईकरांसाठी भाजीपाला आणि दुधाची उद्या टंचाई भासण्याची शक्यता. पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर येथील एक ही तरकारी आणि डेअरीची गाडी मुंबईकडे सोडण्यात येणार नसल्याचे सुत्रांकडून कळते. दरम्यान, वाहतुक रोखण्यात आल्याने या मार्गांवरील टोलवसूलीही थांबवण्यात आली आहे. वाहतुक रोखण्यात आल्याने टोल नाक्यांवर दोन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

त्याचबरोबर मुंबईवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी उद्या सुटणाऱ्या २९ रेल्वे गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या सिंहगड, डेक्कन क्वीन, प्रगती, डेक्कन एक्सप्रेस, इंद्रायणी, इंटरसिटी या एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर विदर्भ एक्सप्रेस, अमरावती एक्सप्रेस आणि शिर्डी फास्ट पॅसेंजर या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या तपोवन, दुरांतो, पंचवटी, मनमाड राज्यराणी, नागपूर सेवाग्राम एक्सप्रेसही रद्द करण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 7:58 pm

Web Title: the traffic to mumbai was stopped by highway police
Next Stories
1 Mumbai Rain: महाराष्ट्राला केंद्राकडून सर्वोतोपरी मदत- पंतप्रधान मोदी
2 आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा; मुख्यमंत्र्यांचे मुंबईकरांना आवाहन
3 मुंबईकरांनो, पावसात अडकला आहात? ‘या’ अपडेट नक्की वाचा
Just Now!
X