News Flash

रेल्वेचे डबे रुळांवरुन घसरले; मुंबई-ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प

दरम्यान, लोकलमधील सर्व प्रवाशी सुखरुप आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

ठाणे-वाशी दरम्यान गणपती पाडा येथे लोकलचे दोन डब्बे रुळावरुन घसरल्याचे वृत्त आहे. यामुळे मुंबई-ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, लोकलमधील सर्व प्रवाशी सुखरुप आहेत. मध्य रेल्वेने याबाबत ट्विट केले आहे.

मध्य रेल्वेच्या ट्विटनुसार, ठाणे-वाशी लोकलचे दोन डबे ठाणे आणि ऐरोली दरम्यान रुळावरुन घसरले. या घटनेनंतर लोकलमधील प्रवाशांना कसलीलीही इजा झालेली नाही. यामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या डब्यांना रुळावर आणण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न सुरु आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2019 7:58 pm

Web Title: the train wrecks haul traffic jam on mumbai trans harbor route aau 85
Next Stories
1 Video : ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’चे जल्लोषात आगमन
2 मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा, मेगाब्लॉक रद्द
3 जुळवून घेऊ नका, जिद्दीने पुढे जा!
Just Now!
X