14 October 2019

News Flash

पश्चिम बंगालमध्ये अधिकारशाहीचा वापर – संजय राऊत

लोकशाहीच्या निवडणुकांमध्ये हिंसाचार होणार असेल तर आम्ही जगामध्ये सर्वात मोठी आणि मजबूत आमची लोकशाही आहे, हे कुठल्या तोंडाने सांगायचे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये अधिकारशाहीचा वापर करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच अशा प्रकारे जर देशाच्या लोकशाहीच्या निवडणुकांमध्ये हिंसाचार होणार असेल तर आम्ही जगामध्ये सर्वात मोठी आणि मजबूत आमची लोकशाही आहे, हे कुठल्या तोंडाने सांगायचे. असा सवालही त्यांनी केला आहे.

संजच राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ममता बॅनर्जींचा जर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांच्याविषयी राजकीय विरोध असेल तर, त्यांना अहमदाबादेत जाण्याचा पुर्ण अधिकार होता. त्यांनी गांधीनगरला, सुरतला किंवा इतर राज्यात जायला हवे होते प्रचारासाठी. परंतु, त्या गेल्या नाहीत. जर तो अधिकार घटनेने ममता बॅनर्जींना दिला आहे तर तोच अधिकार अमित शहा, नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ अशा भाजपच्या सगळ्या नेत्यांना पश्चिम बंगालमध्ये जाऊन प्रचार किंवा रोड शो करण्याचा पुर्ण अधिकार आहे. अशा प्रकारे या देशाच्या लोकशाहीच्या निवडणुकांमध्ये जर हिंसाचार होणार असेल तर आम्ही जगामध्ये सर्वात मोठी आणि मजबूत आमची लोकशाही आहे, हे कुठल्या तोंडाने सांगायचे.

पश्चिम बंगालमध्ये जय श्रीरामचा नारा देता येत नाही. ममता बॅनर्जींना आवडत नाही. ममता बॅनर्जींचे व्यंगचित्र काढणाऱ्या मुलीला तुरूंगात टाकण्यात आले. जर तुम्ही भाजपाच्या नेत्यावर हुकूमशाहीचे अधिकारशाहीचे आरोप करता तर तोच आरोप तुमच्यावरही लागू होतो.

First Published on May 15, 2019 12:47 pm

Web Title: the use of jurisdiction in west bengal