06 December 2019

News Flash

वाशी खाडी पुलावरून उडी मारत महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

एका मच्छिमाराने या महिलेचा प्राण वाचवले

वाशी येथील खाडी पुलावरून उडी मारून एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र या महिलेला मच्छिमारी करणाऱ्या सचिन भोईर यांनी वाचवले. त्यांनी यासंदर्भातली माहिती पोलिसांनाही दिली. ज्यानंतर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या महिलेला उपचारासाठी वाशी महापालिकेच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या महिलेचे नाव काय ते समजू शकलेले नाही. तसेच या महिलेने आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला होता हेदेखील समजू शकलेले नाही. आता या महिलेवर उपचार सुरु असून तिच्या जबाबानंतरच तिला आत्महत्या का करायची होती? तिने इतके टोकाचे पाऊल का उचलले या प्रश्नांची उत्तरं मिळू शकणार आहेत. वाशी पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

First Published on February 11, 2019 5:44 pm

Web Title: the womans suicide attempt by jumping from vashi bridge
Just Now!
X