News Flash

श्रीमंत असतो तर आम्हीही विदेशात शिक्षण घेतले असते – तावडेंचा चव्हाणांना टोला

विधानसभेमध्ये पदवीवरुन गदारोळ करणाऱ्या विरोधकांना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी जोरदार उत्तर दिले.

| July 24, 2015 04:38 am

विधानसभेमध्ये पदवीवरुन गदारोळ करणाऱ्या विरोधकांना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी जोरदार उत्तर दिले. पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील श्रीमंत होते, त्यांच्याकडे पैसा होता म्हणूनच त्यांना ते विदेशात उच्च शिक्षण देऊ शकले. मात्र, आमचे कुटुंब मध्यमवर्गीय होते. माझे वडील हे म्हाडामधील कर्मचारी होते. त्यामुळे आमच्यासारखे गरीब विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वर विद्यापीठातून शिक्षण घेतले. आमच्याकडे जर पैसा असता, तर आम्हीही तुमच्यासारखे विदेशात शिक्षण घेऊ शकलो असतो. आम्ही ज्या ज्ञानेश्वर विद्यापीठात शिकलो, त्या विद्यापीठाची थट्टा करुन एका अर्थाने तुम्ही गरीब विद्यार्थ्यांची थट्टा करीत आहात, ही संस्कृती तुम्हाला शोभते का ? असा सवाल विनोद तावडे यांनी केला. गरीब विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊच नये, हीच तुमची भावना दिसत असल्याचा टोलाही तावडे यांनी मारला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2015 4:38 am

Web Title: then we were also take education from foreign country says vinod tawde
टॅग : Vinod Tawde
Next Stories
1 माजी भाषा संचालक यशवंत कानिटकर यांचे निधन
2 सायबर गुन्ह्यांसाठी पोलिसांचे स्वतंत्र संकेतस्थळ
3 ‘मॉल पाहणीसाठी पथक स्थापन करा’
Just Now!
X