News Flash

…तर सोनियांवर प्रेम करणाऱयांनी इटलीला जावे – विनोद तावडे

जर नरेंद्र मोदींवर प्रेम करणाऱयांनी गुजरातला जायला हवे, तर सोनिया गांधींवर प्रेम करणाऱयांनी इटलीला गेले पाहिजे, असा टोला भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विधान परिषदेतील

| August 6, 2013 10:28 am

जर नरेंद्र मोदींवर प्रेम करणाऱयांनी गुजरातला जायला हवे, तर सोनिया गांधींवर प्रेम करणाऱयांनी इटलीला गेले पाहिजे, असा टोला भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी उद्योगमंत्री नारायण राणे यांना लगावला. राजकीय नेत्यांनी कोणत्याही विषयावर बोलताना भान ठेवले पाहिजे, असेही मत तावडे यांनी व्यक्त केले.
मोदींची स्तुती करणाऱयांनी गुजरातमध्ये जावे, अशा आशयाच्या वक्तव्यावरून अडचणीत सापडलेल्या आपला मुलगा नितेशच्या बचावासाठी मैदानात उतरलेल्या राणे यांनी सोमवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. विधीमंडळात कोणताही प्रश्न मार्गी लावण्यात अपयश आल्याने हताश झालेल्या भाजपने आता ट्विटचे राजकारण सुरू केल्याचा आरोप राणे यांनी केला होता. राणे यांच्या टीकेला विनोद तावडे यांनी उत्तर दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2013 10:28 am

Web Title: then who loves sonia gandhi must go to italy says vinod tawde
Next Stories
1 मोनो-मेट्रो स्थानकांपासून नवे बसमार्ग सुरू करणार
2 शिक्षण मंडळे करतात काय ?
3 गुन्हेगारांच्या शिक्षेचा टक्का वाढला
Just Now!
X