राज्यपालांनी आपले मत व्यक्त केले. त्यास राजकीय उत्तर देण्याची आवश्यकता नव्हती, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनाच टीकेचे लक्ष्य केले.

राज्यपालांकडे येणारी निवेदने त्यांच्या पत्रासह मुख्यमंत्र्यांकडे पाठविली जातात. हा प्रघात आहे. त्यावर मुख्यमंत्री उचित कार्यवाही करतात. राज्यपालांनी धर्मनिरपेक्षतेबद्दल जे काही विचारले ते वडीलकीच्या अधिकारात म्हटलेले आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याच भावनेतून ते घ्यायला पाहिजे होते. परंतु, तसे त्यांनी घेतले नाही, असे फडणवीस म्हणाले. मंदिरे खुली न करण्याची भूमिकाच मला समजलेली नाही. हा विषय केवळ भाविकांचा नाही. आज मंदिरांवर २०-२५ लाख लोक अवलंबून आहेत. तो सगळा गरीब वर्ग आहे, असे फडणवीस म्हणाले.