04 July 2020

News Flash

चोर महिलेची पोलिसांच्या हातावर तुरी

एका महिला चोराने पोलीस ठाण्यातून पळ काढल्याची घटना ओशिवरा पोलीस ठाण्यात उघडकीस आली

एका महिला चोराने पोलीस ठाण्यातून पळ काढल्याची घटना ओशिवरा पोलीस ठाण्यात उघडकीस आली असून तिने पळून जाताना एका पोलिसाचा भ्रमणध्वनीही लंपास केला.

शुक्रवारी सकाळी पळुन गेलेल्या महिलेला शोधण्यासाठी एका पथकाची निर्मिती करण्याची नामुष्की पोलिसांवर ओढवली आहे. नालासोपारा येथे राहणारी भारती शिंदे (५१) ही सराईत चोर आहे. एखाद्या घरात मोलकरणीचे काम मिळवून तिथे काही दिवसांनी चोरी करुन पोबारा करण्याची पध्दत भारतीने अवलंबली होती. एका सरकारी अधिकाऱ्याच्या घरात चोरी केल्याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी भारतीला अटक केली होती. तिच्यावर नजर ठेवण्यासाठी एका महिला पोलीस शिपाईला तैनात करण्यात आले होते.  शुक्रवारी सकाळी महिला शिपाई प्रसाधनगृहात गेल्याचे पाहून भारतीने ठाण्यातून काढता पाय घेतला. पळताना तिने अंमलदारांच्या कक्षात चार्जिगला लावलेला भ्रमणध्वनीही लंपास केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2016 12:36 am

Web Title: thief woman cheat with police
टॅग Robbery
Next Stories
1 कचराभूमी आग; नऊ व्यापाऱ्यांना अटक
2 काँग्रेसच्या पाठिंब्याने शेकाप विजयी
3 गाव दत्तक घेण्याची गणेश मंडळांची तयारी
Just Now!
X