मुंबई : संचारबंदीमुळे दारू मिळणे कठीण झाल्याने चोरटय़ांकडून सध्या दारूच्या दुकानांवर डल्ला मारण्याचे काम सुरू आहे. गोवंडीच्या शिवाजीनगरात रविवारी मध्यरात्री चोरटय़ांनी दारूचे दुकान फोडून, त्यातून दीड लाख रुपये किमतीची दारू घेऊन पोबारा केला. याआधी कुल्र्यातील एका गोदामातून चोरटय़ांनी सव्वा लाख रुपये किमतीचे मद्य लंपास केले होते.

संचारबंदीमुळे हे दुकान अनेक दिवसांपासून बंद आहे. मात्र रविवार रात्री काही चोरटय़ांनी या दुकानात घुसून दुकानातील दीड लाख रुपये किमतीची दारू घेऊन पोबारा केला. दुकान मालकाला सोमवारी सकाळी याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दोन आरोपींना अटक करत काही प्रमाणात चोरलेली दारू हस्तगत केली आहे. काही दारू दोघांनी फस्त के ल्याचे पोलिसांनी सांगितले.

करोनामुळे मुंबईत संचारबंदी असल्याने शहरातील गुन्हेगारी मोठय़ा प्रमाणात कमी झाली आहे. पोलिसांनी गोदाममधील सीसीटीव्ही चित्रण तपासले असता चार आरोपींची ओळख पटली. पोलिसांनी यातील इरफान खान (२१) आणि वसंत नाईक (२२) या दोन आरोपींना अटक केली.