04 July 2020

News Flash

Coronavirus : मुंबईत तीस हजारांवर रुग्ण

विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेऊन बऱ्या झालेल्या ५९८ जणांना रविवारी घरी पाठवण्यात आले

फोटो सौजन्य - प्रशांत नाडकर

मुंबई : मुंबईमध्ये रविवारी एक हजार ७२५ जणांना करोनाची बाधा झाली असून बाधितांची संख्या ३० हजार ३५९ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात ३९ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या ९८८ वर पोहोचली आहे.

आतापर्यंत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या संशयित रुग्णांची संख्या २५ हजार १३१ इतकी झाली आहे.  विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेऊन बऱ्या झालेल्या ५९८ जणांना रविवारी घरी पाठवण्यात आले. बरे झाल्यामुळे रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आठ हजार ७४ इतकी झाली आहे. दरम्यान, मुंबईमधील रुग्णवाढीचा दर सर्वसाधारण सरासरी ६.६१ टक्क्यांवर आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

वसई-विरार शहरात रविवारी २४ नव्या करोना रुग्णांमुळे येथील करोनाबाधितांची संख्या ५११ एवढी झाली आहे. रविवारी एकाचा मृत्यू झाला असून आतापर्यंत २० जणांचा करोनाने बळी घेतला आहे.

नवी मुंबईत दोघांचा मृत्यू

रविवारी नवी मुंबई शहरात करोनाचे ८५ नवे करोना रुग्ण आढळले असून दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांमध्ये ३२ महिला आणि ५३ पुरुषांचा समावेश आहे. करोना रुग्णांची संख्या १ हजार ६४६ इतकी झाली आहे.

रविवारी सर्वाधिक १९ रुग्ण हे घणसोली, त्यानंतर कोपरखरणे १८, तुर्भे १७, नेरुळ ९, ऐरोली ७, बेलापूर ६, वाशी ५ व दिघा विभागात ४ रुग्ण सापडले. तर रविवारी एका दिवसात ५२ करोना रुग्ण बरे झाले आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात ३१९ नवे करोना रुग्ण

ठाणे : ठाणे जिल्ह्य़ात रविवारी एकाच दिवसात ३१९ नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ातील करोना रुग्णांची संख्या ५ हजार ७०१ इतकी झाली आहे. रविवारी ठाणे शहरात सर्वाधिक १२७ रुग्ण आढळून आल्याने या शहरातील रुग्णांची संख्या आता दोन हजारांच्या पुढे गेली आहे. जिल्ह्य़ात एका दिवसात ९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने आतापर्यंतचा मृतांचा आकडा १७२ इतका झाला आहे.

रविवारी दिवसभरात ठाणे शहरातील १२७, नवी मुंबईतील ८५, कल्याण-डोंबिवली ४६, भिवंडी ६, अंबरनाथ ४, उल्हासनगर २५, बदलापूर ५, मीरा-भाईंदर ११ आणि ठाणे ग्रामीणमधील १० रुग्णांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2020 4:33 am

Web Title: thirty thousand covid 19 positive patients in mumbai zws 70
Next Stories
1 स्थलांतरितांचा प्रश्न गंभीर
2 Coronavirus Outbreak : दीड हजार बळी, ५० हजार रुग्ण
3 टाळेबंदीचे दोन महिने : बदलले थोडे बाकी थिजलेले..
Just Now!
X