News Flash

CSMT Bridge collapsed : पुलाचं ऑडिट झालेलं नाही, याला रेल्वेचं जबाबदार – नगरसेविका सुजाता सानप

लोअर परळचा ब्रिज कोसळला त्यानंतर सगळ्या पुलाचं ऑडिट झालं होतं मात्र, या पुलाचं ऑडिट झालेलं नव्हतं.

CSMT Bridge collapsed : पुलाचं ऑडिट झालेलं नाही, याला रेल्वेचं जबाबदार – नगरसेविका सुजाता सानप
संध्याकाळी वर्दळीच्या वेळी हा अपघात घडल्याने सीएसटी स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी तयार झाली.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील कोसळलेल्या पादचारी पुलाचं ऑडिट झालं नव्हतं त्यामुळेच ही दुर्घटना घडली, म्हणूनच याला रेल्वे जबाबदार आहे, असा आरोप स्थानिक नगरसेविका सुजाता सानप यांनी केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

सानप म्हणाल्या, लोअर परळचा ब्रिज कोसळला त्यानंतर सगळ्या पुलाचं ऑडिट झालं होतं मात्र, या पुलाचं ऑडिट झालेलं नव्हतं. याकडे दुर्लक्ष केल्यानेच ही दुर्घटना घडली आहे. या घटनेची संपूर्ण जबाबदारी ही रेल्वेची आहे. यासंबंधी आधीचे नगरसेवक गणेश सानप यांनी रेल्वे प्रशासनाशी याप्रकरणी वारंवार पत्रव्यवहार केला आहे. मात्र, तरीही यावर अद्याप काहीही कर्यवाही करण्यात आलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2019 8:28 pm

Web Title: this bridge has not been audited railway is responsible for it says corporator sujata sanap
Next Stories
1 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळचा पादचारी पूल कोसळला, सहा ठार
2 ‘ज्यांच्या मुलानं आघाडी सोडून भाजपात प्रवेश केला त्यांनी आघाडीबाबत बोलू नये’
3 पक्षनिष्ठेबाबत हायकमांडला उत्तर देईन, थोरातांना देण्याची गरज नाही : विखे-पाटील
Just Now!
X