22 October 2020

News Flash

मनसेच्या इशाऱ्यानंतर फ्लिपकार्टने दिलं हे महत्त्वाचं आश्वासन

फ्लिपकार्टने दिलं महत्त्वाचं आश्वासन

सात दिवसात फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनने मराठीत अ‍ॅप आणलं नाही तर त्यांची दिवाळी मनसे स्टाइल सारी होईल असा इशारा मनसेने दिला. त्यानंतर फ्लिपकार्टने एक महत्त्वाचं आश्वासन दिलं आहे. ग्राहकांना नवनवीन आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पूर्णपणे स्वदेशी इ कॉमर्स प्लॅटफॉर्म असलेली फ्लिपकार्ट भारतात इ-कॉमर्स सर्वदूर पोहोचवण्यासाठी; तसेच या उद्योगाचे लोकशाहीकरण करण्यासाठी कटिबद्ध आहे असं फ्लिपकार्टने म्हटलं आहे.

भाषा आणि व्हॉइस सोल्युशनचा पर्याय देण्याचा फ्लिपकार्टचा निर्धार

सध्या उपलब्ध असलेल्या भाषांव्यतिरिक्त अन्य अनेक भाषांचाही फ्लिपकार्टच्या प्लॅटफॉर्मवर समावेश असेल. भारतात सर्वदूर पोहोचण्यासाठी आपल्या देशातील विविध भाषा आणि व्हॉइस सोल्युशन्सचा वापर करण्याचा फ्लिपकार्टचा निर्धार आहे. मातृभाषेतून ई-कॉमर्सच्या वापरामुळे या उद्योगाकडे मोठ्या प्रमाणात ग्राहक आकर्षित तर होतीलच; पण आपल्या देशातील लाखो लघु उद्योजक व मध्यम उद्योजक तसेच कारागिरांनाही एक प्रचंड मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल असं फ्लिपकार्ट प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टचा महासेल १६ ऑक्टोबरपासून सुरु झाला आहे. दिवाळी या सणाच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारची सूट आणि ऑफर्स या दोन कंपन्यांनी देऊ केली आहे. अशात मनसेने या दोन्ही कंपन्यांना मराठीत अ‍ॅप आणा अन्यथा दिवाळी मनसे स्टाइल साजरी होईल असा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आता फ्लिपकार्टने महत्त्वाचं आश्वासन दिलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 6:50 pm

Web Title: this is an important assurance given by flipkart after the mns warning scj 81
Next Stories
1 कंगनाविरोधात एफआयआर दाखल करा, कोर्टाचा मुंबई पोलिसांना आदेश
2 मुंबईत बेस्टच्या मिनी बसचा अपघात, १० प्रवासी जखमी
3 “तुम्ही महाराष्ट्राची मान उंचावली”; आशिष शेलारांनी केलं मुख्यमंत्र्यांचे पुत्र तेजस ठाकरेंचं कौतुक
Just Now!
X