देशातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील एंटेलिया या निवासस्थानाबाहेर गुरूवारी संध्याकाळी स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पिओ गाडी आढळल्याने एकच खळबळ उडाली. गाडीत जिलेटीन या स्फोटकांच्या सुट्टया कांड्या होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली. याशिवाय गाडीत एक पत्रही सापडल्याची माहिती समोर आली आहे.

“नीता भाभी और मुकेश भैय्या, ये तो ट्रेलर है” अशा आशयाचं पत्र पोलिसांना अंबानींच्या घराबाहेर असलेल्या स्कॉर्पिओमधून सापडल्याची माहिती आहे. पण पोलिसांनी चिठ्ठीतील मजकुराबाबत सविस्तर माहिती अद्याप दिलेली नाही. तसेच, अंबानी यांच्या ताफ्यातील आणखी काही गाड्यांच्या नंबर प्लेट पोलिसांना सापडल्या असल्याची माहिती समोर येत आहे.

Mumbai, expensive mobile phones
मुंबई : ऑनलाईन फसवणूक करून महागड्या मोबाईलची खरेदी
Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”
fire workers huts at Mira road
मिरारोड येथे कामगारांच्या झोपड्यांना भीषण आग, चार सिलेंडरचा स्फोट; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
vasai crime news, wife s murder accused marathi news
वसई: पत्नीच्या हत्येचा आरोपी पॅरोलवरून फरार, वालीव पोलिसांनी ५ वर्षानंतर केली अटक


दरम्यान, अंबानी यांच्या घरापासून काही अंतरावरच स्कॉर्पिओ उभी होती. गाडीत स्फोटके असल्याची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या व वाहनाची कसून तपासणी करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी अंबानींच्या घराबाहेर बंदोबस्तात वाढ केली असून जलद प्रतिसाद पथक तैनात करण्यात आले आहे. कारमायकल रोडवर मोठया प्रमाणावर पोलिसांसह कमांडोही तैनात करण्यात आले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत.


तर, “उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराच्या काही अंतरावर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये जिलेटीन स्फोटकाच्या २० कांड्या सापडल्या आहेत. या घटनेची संपूर्ण चौकशी मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस करीत असून चौकशीतून लवकरच सत्य समोर येईल”, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.