News Flash

गर्विष्ठ भाजपाच्या शेवटाला आता सुरुवात झाली – नवाब मलिक

"शिवसेनेचा जन्म हा जातीयवादी राजकारण करण्यासाठी झालेला नाही. तर महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेसाठी शिवसेना स्थापन झाली होती."

संग्रहित छायाचित्र

भारतीय जनता पार्टी हा पक्ष गर्विष्ठ पक्ष बनला आहे. मात्र, आता या भाजपाच्या शेवटाला सुरुवात झाली आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजपावर टीका केली आहे. आज दिवसभरात झालेल्या राज्यातील राजकीय ड्राम्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

बहुमत नसल्याने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढवल्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर मलिक यांनी टीका केली. तसेच महाविकास आघाडी दीर्घकाळ टिकेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील असे शरद पवार यांनी स्पष्ट केले असून स्वतः उद्धव ठाकरेंनी देखील हे मान्य केल्याचे सांगितले.

शिवसेनेचा जन्म हा जातीयवादी राजकारण करण्यासाठी झालेला नाही. तर महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेसाठी शिवसेना स्थापन झाली. उलट भाजपासोबत हातमिळवणी केल्याने शिवसेनेची फरपट झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 6:19 pm

Web Title: this is the start of bjps end bjp has become very arrogant says nawab malik aau 85
Next Stories
1 किमान समान कार्यक्रमाला सोनिया गांधींची संमती; महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर प्रकाशन
2 फडणवीसांच्या नावावर झाली तीन विक्रमांची नोंद
3 “काहींना वाटतं…”; फडणवीसांच्या राजीनाम्यानंतर निलेश राणेंचे ट्विट
Just Now!
X