गेली दोन वर्षे अवयवदानाबाबत होत असलेल्या जागृतीनंतर नव्या वर्षांची सुरुवात मृत्यूनंतरच्या अवयवदान मोहिमेला बळ देणारी ठरली. या वर्षांतील पहिले अवयवदान नुकतेच पार पडले.
नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या २१ वर्षीय तरुणाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याची दोन्ही मूत्रपिंड तसेच यकृत दान करण्यासाठी मान्यता दिली. त्यानंतर नानावटी रुग्णालयात ४८ वर्षीय पुरुषावर तसेच लीलावतीमध्ये ३८ वर्षांच्या पुरुषावर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. ५१ वर्षांच्या पुरुषाला यकृतदान देण्यात आले. ही या वर्षांतील अवयवदानाची पहिलीच घटना ठरली.
गेल्या वर्षी ४२ मृत्यूपश्चात अवयवदान पार पडली होती. त्यापूर्वी २०१४ मध्ये ४१ जणांकडून अवयवदान करण्यात आले. याचदरम्यान औरंगाबाद येथे पहिलेच अवयवदान पार पडले.