13 July 2020

News Flash

‘त्या’ रक्तपेढय़ांचे परवाने रद्द करणार

शासननिर्णय डावलून मनमानीप्रमाणे शुल्क आकारणाऱ्या रक्तपेढय़ांकढून खुलासा मागवण्यात आला आहे. वाढीव शुल्क घेत असलेल्या सर्व रक्तपेढय़ांचा परवाना रद्द होईल, अशी ठाम भूमिका राज्याच्या आरोग्य संचालकांनी

| November 30, 2014 05:31 am

शासननिर्णय डावलून मनमानीप्रमाणे शुल्क आकारणाऱ्या रक्तपेढय़ांकढून खुलासा मागवण्यात आला आहे. वाढीव शुल्क घेत असलेल्या सर्व रक्तपेढय़ांचा परवाना रद्द होईल, अशी ठाम भूमिका राज्याच्या आरोग्य संचालकांनी घेतली आहे. मात्र त्याचवेळी रक्त आणि रक्तघटकांवर वाढीव दर आकारणाऱ्या रक्तपेढय़ांवर कारवाई झाल्यास संघटनाही त्यांना पाठीशी घालणार नाही, असे रक्तपेढय़ांच्या राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. दिलीप वाणी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कारवाईच्या भीतीने राज्यातील काही रक्तपेढय़ांनी तातडीने दर खाली आणले आहेत.
रक्तघटकांच्या वाढीव किंमतीच्या तसेच खासगी रक्तपेढय़ांकढून घेतल्या जात असलेल्या मनमानी दरांच्या बातम्या ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध झाल्यावर अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील सर्व- ३०९ रक्तपेढय़ांची पाहणी केली. त्यातील ७२ रक्तपेढय़ा ज्यादा शुल्क घेत असल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवल्या. संदर्भीय अहवाल आरोग्य संचालकांकडे देण्यात आला. नोटीस गेल्यानंतर तीन रक्तपेढय़ांनी तातडीने दर कमी केले व पुन्हा असा प्रकार घडणार नसल्याचे कळवले. मात्र त्यांची नावे उघड करता येणार नाहीत. रक्तपेढय़ांकडून पुढील आठवडय़ात खुलासे येणे अपेक्षित आहे. जास्त शुल्क आकारणाऱ्या रक्तपेढय़ांचे परवाने रद्द केले जातील, असे आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार म्हणाले.
रक्त व रक्तघटक सुरक्षा चाचण्यांचा खर्च विभागणीचे प्रमाण शासनाच्या समितीकडून देण्यात आले असले तरी रक्तपेढीनुसार हे प्रमाण बदलण्याचीही मुभा ठेवण्यात आली आहे. मात्र त्यासंबंधी राज्य रक्त संक्रमण परिषदेला कळवून परवानगी घेणे आवश्यक आहे. बहुतांश रक्तपेढय़ांनी अशी परवानगी घेतली नसल्याने त्यांच्यावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई ओढवली असल्याचे इंडियन सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्युजन अॅण्ड इम्युनोहिमॅटोलॉजीच्या राज्य विभागाचे अध्यक्ष डॉ. दिलीप वाणी यांनी सांगितले.मात्र या निमित्ताने मनमानी कारभार करणाऱ्या रक्तपेढय़ांवर वचक बसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

खासगी रक्तपेढय़ातील शासनमान्य दर
*संपूर्ण रक्त – १४५० रुपये
*लाल पेशी – १४५० रुपये
*प्लाझ्मा – ४०० रुपये
*प्लेटलेट्स – ४०० रुपये
*क्रायोप्रेसिपिटेट – २५० रुपये

सुरक्षाचाचण्यांचे दर
*नॅट – १२०० रुपये
*केमिल्युमिनेसन्स – ५०० रुपये
*एचआयव्ही – ५० रुपये
*एचसीव्ही – १५०
*अॅण्टी एचबीसी – २५०
*अॅण्टीबॉडी डोनर – ५०० रुपये
*ल्युको फिल्ट्रेशन (लाल पेशी )- १००० रुपये
*ल्युको फिल्ट्रेशन (प्लेटलेट्स) – १५०० रुपये
*ग्रुपिंग, क्रॉस मॅचिंग (ऑटोमेटिक) – २८० रुपये
*ग्रुपिंग व क्रॉस मॅचिंग (सेमीऑटो.) – १२० रुपये
*फिनोटायपिंग – ५०० रुपये
*इरॅडिएशन – १००० रुपये
*जीवाणू शोधक – ४०० रुपये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2014 5:31 am

Web Title: those blood banks licence to be cancelled
Next Stories
1 कामोठय़ात कांदळवनांची काळोखात कत्तल
2 ‘वाळीत’ प्रथेच्या मनमानीस लगाम बसणार!
3 रसायनामुळे १२५ अत्यवस्थ
Just Now!
X