मुंबईमधला ज्ञात असलेला सगळ्यात जुना किल्ला म्हणजे माहिमचा किल्ला. अकराव्या शतकामध्ये प्रताप बिंबाच्या काळात या किल्ल्याच्या बांधकामास सुरूवात झाली. मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या या किल्ल्यानं अनेक सागरी युद्ध अनुभवली. केळवे माहिम ताब्यातून गेल्यावर प्रताप बिंबानं इथं राज्याचं ठाणं वसवण्याचं ठरवलं आणि हा किल्ला बांधायला घेतला. त्याचं नामकरण माहिम असं केलं. माहिमचा किल्ला नंतर सुलतानाच्या, पोर्तुगिजांच्या व इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्यामुळे वेगवेगळ्या राजवटींचा प्रभाव किल्ल्याच्या बांधकामावर पडलेला दिसतो. १९७० नंतर या किल्ल्याची दुर्दशा झाली असून दोन एकर विस्तार असलेल्या या किल्ल्याच्या आतमध्ये तीन तीन मजली झोपड्या आहेत व जाडजूड माणसाला सरळ चालत जाता येणार नाही अशी स्थिती आहे.

‘गोष्ट मुंबईची’ मालिकेतील हा व्हिडीओ कसा वाटला? याविषयी प्रतिक्रिया द्यायला आणि शेअर करायला विसरु नका. त्याचबरोबर मालिकेतील यापूर्वीचे बघायचे राहून गेलेले भाग बघण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह या यु ट्यूब चॅनेलला भेट द्या.