News Flash

६० वर्षांच्या आतील घरकामगार महिलांनाच मदत

‘महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळा’कडे नोंदणी झालेल्या घरकामगार महिलांना राज्य सरकारकडून १५०० हजार रुपये मदत दिली जाणार आहे.

हजारो गरजू महिला मदतीपासून वंचित राहणार

मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्य सरकारने घरकामगार महिलांना प्रत्येकी १,५०० रुपयांच्या मदतीचा हात दिला असला तरी ही मदत केवळ ६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांनाच दिली जाणार आहे. परिणामी ६० वर्षांपुढील गरजू घरकामगार महिला सरकारी मदतीपासून वंचित राहणार आहेत.

‘महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळा’कडे नोंदणी झालेल्या घरकामगार महिलांना राज्य सरकारकडून १५०० हजार रुपये मदत दिली जाणार आहे. शासन पातळीवर याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र सरकारच्या निकषात १८ ते ६० वयोगटांतील नोंदणीकृत महिलांनाच मदत देण्याची अट घातली आहे. गेल्या कित्येक वर्षांत मंडळ निष्क्रिय असल्याने आधीच मंडळाकडे नोंदणी केलेल्या घरकामगार महिलांची संख्या कमी आहे. त्यात सरकारने वयाच्या अटीचा निकष लागू केल्यास अनेक गरजू महिला लाभापासून वंचित राहणार आहेत.

बेबी बांगी या घरकामगार महिला ६३ वर्षांच्या आहेत. त्यांच्या पतीचे निधन झाले आहे. मुले सांभाळ करत नसल्याने त्या एकटय़ाच राहतात. ‘यापूर्वी चार घरांत काम करत होते. सध्या वयोमानामुळे काम होत नाही. त्यामुळे एकाच घरचे काम करते. त्यातून १७०० रुपये मिळतात. कामगार विभागाकडे २०११ साली नोंदणी होती. तेव्हा काही मदत मिळाली. त्यानंतर कोणतीच मदत मिळाली नाही’, असे बांगी यांनी सांगितले.

‘घरकामगार महिला संघटित क्षेत्रात काम करत नाही . या कामातून मिळालेल्या मोबदल्यातून बचत करणेही शक्य नसते. त्यामुळे वयाच्या साठीनंतर घरी बसून खाता येईल इतकीही बचत महिलांजवळ नसते. या महिलांना आयुष्यभर घरकाम करण्याशिवाय पर्याय नसतो. सरकार ६० वर्षांपुढील घरकामगार महिलांना मदत देणार नसेल, तर त्यांना किमान निवृत्ती वेतन देण्यात यावे’, अशी मागणी कष्टकरी घरकामगार संघटनेच्या मधु विरमुडे यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 2:17 am

Web Title: thousands of needy women will be deprived of help ssh 93
Next Stories
1 बेस्टमधील कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीची प्रतीक्षा
2 मुंबई, ठाणे आरटीओला करोनाचा विळखा
3 करोना संसर्गामुळे मधुमेह
Just Now!
X