मुंबई : रिझर्व्ह बँके चे मुख्यालय उडवून देऊ, अशी धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवला. ८ एप्रिलला रिझर्व्ह बँके च्या एका विभागास धमकीचा ईमेल प्राप्त झाला. त्यात ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेचा उल्लेख होता, असे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले. ईमेलबाबत माहिती मिळताच पोलिसांनी रिझर्व्ह बँके च्या इमारतीभोवतीची सुरक्षा वाढवली.