स्वातंत्र्यदिनानिमित्त उल्हासनगर येथे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि कल्याण जिल्हा संघातर्फे उल्हासनगर येथे बुधवारी ‘ऐतिहासिक तिरंगा यात्रा’चे आयोजन करण्यात आले होते. ‘एक देश, एक तिरंगा, एक ही सपना, अखंड भारत देश हो अपना’ हे या यात्रेमागील उद्दिष्ट असल्याचे आयोजकांनी सांगितले. विशेष म्हणजे यामध्ये साडेतीन किमी लांबीचा तिरंगा तयार करण्यात आला होता.

उल्हासनगरच्या धोबी घाट येथून यात्रेची सुरवात करण्यात आली होती. या ऐतिहासिक तिरंगा यात्रेत ३००० पेक्षा जास्त नागरिकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. यामध्ये महिलांची संख्या उल्लेखनीय होती. यात्रेचा शेवट गुरुद्वारा नाका चोपडा कोर्टजवळ करण्यात आली. तेथे बजरंग दलाच्या कल्याण जिल्हा संयोजक अर्जुन भाबड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यात्रेचे नेतृत्व राजन चौधरी जिल्हा सह संयोजक बजरंग दल, अनिकेत सिंह, गणेश मिश्रा, आशिष यादव, रविशंकर मिश्रा, रायसाहब यादव यांनी केले. उल्हासनगर शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांनी यात्रेमध्ये आपला सहभाग नोंदवला. बजरंग दलातर्फे ३.५ किलोमीटर लांबीचा तिरंगा घेऊन निघालेल्या या यात्रेने एक अनोखा विक्रम नोंदवल्याचे सुत्रांकडून कळते.