News Flash

तीन आरोपी गजाआड

गोरेगाव येथील १६ वर्षीय तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी िदडोशी पोलिसांनी फरारी आरोपींपैकी तिघांना दिवा येथून अटक

| November 6, 2013 06:31 am

गोरेगाव येथील १६ वर्षीय तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी फरारी आरोपींपैकी तिघांना दिवा येथून अटक केली असून आणखी तिघांचा शोध सुरू आहे. एकूण चौघांनी बलात्कार केल्याचा आरोप असून दोन तरुणांनी   आरोपींना मदत केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करायला टाळाटाळ केल्याप्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्याच्या दोन पोलिसांना निलंबित करण्याची शिफारस पोलीस उपायुक्तांनी केली आहे.
गोरेगावच्या संतोषनगर येथील एका चाळीत १६ वर्षीय पीडित मुलगी भाऊ आणि आजीसोबत रहाते. १ नोव्हेंबरला तिला तिच्या एका अल्पवयीन मित्राने दिवाळीनिमित्त पार्टीसाठी बोलावले. रात्री साडेआठ वाजता म्हाडा पुलाखाली भेटण्याचे ठरले. तेथे त्यांचा आणखी एक मित्र अफजल असगर खान देखील उपस्थित होता. अफजलने आपले तीन मित्र वसीम हाफिज सैय्यद उर्फ वसीम वट्टा (२३),  युवराज उर्फ सूर्या सेवन पिल्ले (१९) आणि शिवकुमार उर्फ कलवा बडीलाल विश्वकर्मा (१९) यांनाही बोलावले होते. येताना हे तिघे बीयर घेऊन आले होते. त्यांनी तिला बीयर पाजून नंतर शीतपेयातून गुंगीचे औषध दिले.
एका निर्जन ठिकाणी नेऊन यापैकी चौघांनी तिच्यावर बलात्कार केला. दिंडोशी पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून आरोपींना अटक केल्याची माहिती
परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त प्रवीण पाटील यांनी दिली.
पीडित मुलीला पोलिसांची दमबाजी
या घटनेनंतर शनिवारी पहाटे पीडित मुलगी भावासह पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला गेली होती. मात्र पोलिसांनी तिलाच दमबाजी केली. ‘कशाला गेली होतीस’, ‘बियर पिताना लाज वाटली नाही का’ अशा प्रश्नांचा भडीमार करत आणि वर तिलाच दमबाजी करून पोलिसांनी तिला परत पाठवले. एका समाजसेविकेने पुढाकार घेतल्यानंतर रविवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करून न घेणारे तसेच दमबाजी करणारे पोलीस निरीक्षक बी. एस. गायकवाड आणि पोलीस उपनिरीक्षक डी.जी.दैसमे याप्रकरणी दोषी आढळले असून त्यांना निलंबित करण्याची शिफारस
प्रवीण पाटील यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2013 6:31 am

Web Title: three arrested for gang raping 16 year old in mumbais goregaon
Next Stories
1 प्रियकराकडून फॅशन डिझायनरची हत्या
2 मंगळयान फेसबुकवर लाइव्ह
3 एसटीची ३३० कोटींची ‘सामाजिक बांधिलकी’
Just Now!
X