07 August 2020

News Flash

कॅनरा बँकेत ५५ लाखांची चोरी करणारे त्रिकुट गजाआड

कॅनरा बँकेच्या स्ट्राँग रूममधून ५५ लाख रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या गुन्ह्याचा शोध घाटकोपर पोलिसांनी लावला असून चोरटय़ा त्रिकुटाला अटक केली आहे.

| September 10, 2014 03:50 am

कॅनरा बँकेच्या स्ट्राँग रूममधून ५५ लाख रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या गुन्ह्याचा शोध घाटकोपर पोलिसांनी लावला असून चोरटय़ा त्रिकुटाला अटक केली आहे. विशेष म्हणजे अशाच पद्धतीने या त्रिकुटाने तीन बँकांमध्ये चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.
कॅनरा बँकेची घाटकोपर (प) येथे एक शाखा आहे. २५ ऑगस्ट रोजी रात्री बँकेचे स्ट्राँगरूम बनावट चावीने उघडून तेथील ५५ लाख रुपये लंपास करण्यात आले होते. बँकेची कडक सुरक्षाव्यवस्था भेदून ही जबरी चोरी करण्यात आल्याने पोलिसांची झोप उडाली होती. बँकेच्या स्ट्राँगरूमची चावी केवळ दोनच व्यक्तींकडे असते. त्यांच्या चौकशीतूनही काही निष्पन्न झाले नव्हते. चोरांनी सीसीटीव्हीत कैद होऊ नये यासाठी छत्री आणि हेल्मेट घालून बँकेत शिरले होते. पोलिसांनी बनावट चावी बनविणाऱ्या ६० ते ७० जणांची चौकशी केली. त्यातून मग त्यांना या चोरीचा उलगडा झाला आणि काही संशयितांची धरपकड सुरू झाली. त्यातून  पोलिसांनी युसूफ मेहबूब खान (३३), मोहम्मद इरफान शेख (३२) आणि हृषिकेश बारीक (३३) या तिघांना अटक केली. त्यांच्यासोबत एका महिलेचाही सहभाग असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलिसांनी या महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. बँकेतील अन्य कुणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. या त्रिुकटाच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. २०१२ मध्ये शिवाजी पार्क तसेच २०११ मध्ये दादर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या बँकांमधील चोरी याच टोळीने केल्याचे उघड झाले आहे. वर्षभरात एकाच बँकेत  पद्धतशीर योजना आखून चोरी करायची अशी या टोळीची कार्यपद्धती होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2014 3:50 am

Web Title: three arrested in 55 lakh canara bank robbery
टॅग Robbery
Next Stories
1 फेसबुक मित्राकडून मैत्रिणीच्या आईची हत्या
2 मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
3 गणरायाच्या नादात दुमदुमली मुंबापुरी
Just Now!
X