30 May 2020

News Flash

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी अडचणीतच

प्रवेश घेण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी विद्यार्थी करीत आहेत.

प्रतिनिधिक छायाचित्र

प्रवेश घेण्यासाठी अवघ्या तीन दिवसांची मुदत; बँकांच्या सुट्टय़ांमुळे लाखोंचे शुल्क भरण्याची समस्या

मुंबई : खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी (एमडी, एमएस) प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना आता प्रवेश मिळणार असल्याचे स्पष्ट झाले. तरीही विद्यार्थ्यांच्या अडचणी काही संपलेल्या नाहीत. या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी अवघ्या तीन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. मात्र या तीन दिवसांत बँकांना सुट्टय़ा असल्यामुळे शुल्क कसे भरायचे किंवा कर्जाची प्रक्रिया कशी पूर्ण करावी, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.

व्यवस्थापन कोटय़ासाठी चारपट शुल्क आकारण्याची मुभा खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी संस्थांनी सहमती दर्शवली. त्यानंतर या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी पहिली सुधारित गुणवत्ता यादी प्रवेश परीक्षा कक्षाने गुरुवारी जाहीर केली. पहिल्या फेरीत प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांना या यादीनुसार प्रवेश देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना या यादीनुसार प्रवेश निश्चित करण्यासाठी २७ ते २९ एप्रिल अशी मुदत आहे.

मुदत वाढविण्याची मागणी

खासगी महाविद्यालयांचे शुल्क हे प्रतिवर्ष १० ते १२ लाखांच्या घरात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शुल्काची रक्कम जमविण्यासाठी जुळवाजुळव करावी लागणार आहे. हे शुल्क भरण्यासाठी बहुतेक विद्यार्थी कर्ज घेतात. आधी प्रवेशाबाबत संदिग्धता असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या कर्ज प्रक्रिया पूर्ण झालेल्या नाहीत. अशातच २८ एप्रिल ते १ मेपर्यंत म्हणजेच सलग दिवस बँकांना सुट्टी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अवघ्या एका दिवसाचा कालावधी मिळणार आहे. बहुतेक विद्यार्थ्यांना बाहेरगावच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाले आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागणार आहे. त्यामुळे प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण कशी करावी, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. प्रवेश घेण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी विद्यार्थी करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2018 3:15 am

Web Title: three days remain to get admission in medical postgraduate course
Next Stories
1 कुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू!
2 कंबरडे मोडलेल्या चळवळीला सावरण्याचे नक्षलवाद्यांपुढे आव्हान
3 ‘मोफत दूध वाटप सप्ताहा’द्वारे अभिनव निषेध आंदोलन
Just Now!
X