विक्रोळी पार्कसाइट येथील एका एकमजली इमारतीला शनिवारी लागलेल्या आगीत सिलिंडरचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील तिघे ठार झाल्याची घटना घडली.
शनिवारी दुपारी ३.३० च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली. तळमजल्यावरील गादीच्या दुकानातील कापसामुळे आग आणखीच भडकली आणि संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील घरातील सिलिंडरचाही या आगीमुळे स्फोट झाल्याने येथे राहणाऱ्या कुटुंबातील तिघे होरपळून मृत्युमुखी पडले. सलमा बेलिम (४०), मोहम्मद बेलिम (८) आणि मेहराज बेलिम (१५) अशी मृतांची नावे आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 7, 2016 2:26 am