News Flash

रेल्वे अपघातात मातेसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू, बोईसरजवळील दुर्दैवी घटना

मृतांमध्ये आठ महिन्यांचे बाळ व चार वर्षीय मुलीचा समावेश

बोईसर रेल्वे स्थानकानजीक असलेल्या खैराफाटक पुलाजवळ रेल्वे रुळ ओलांडताना मालगाडीने तिघांना उडवले. यामध्ये मातेसह तिच्या दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला.

यामध्ये मातेसह आठ महिन्यांचे बाळ व चार वर्षीय मुलीचा समावेश आहे. मृतांची ओळख अजूनही पटलेली नाही. या पुलानजीक अपघात घडण्याची ही जवळपास सहावी घटना आहे. अपघात नेमका कसा झाला, याचे कारण मात्र समजू शकले नाही.

आतापर्यंत खैराफाटक पुलाजवळ रेल्वे फाटक ओलांडताना अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2020 1:46 pm

Web Title: three died in accident while crossing railway track in boisar pkd 81
Next Stories
1 मुंबई मॅरेथॉन, कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे एका धावपटूचा मृत्यू
2 संजय राऊत शिवसेनेसाठी डोकेदुखी?
3 राज्यातील ६०८ एसटी स्थानकांचा लवकरच कायापालट
Just Now!
X