News Flash

रुग्णाच्या नातेवाईकांची केईएममधील डॉक्टरांना सळईने मारहाण

डॉक्टरांना मारहाणीनंतर केईएममधील निवासी डॉक्टर सकाळी आठ वाजल्यापासून एक दिवसाच्या संपावर गेले आहेत

एका रुग्णाच्या नातेवाईकांनी केईएममधील डॉक्टरांना सळईने मारहाण केली.

रुग्णाच्या नातेवाईकांनी केईएम रुग्णालयातील तीन डॉक्टरांना सळईने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सकाळी घडला. मारहाण झालेल्या दोन डॉक्टरांच्या डोक्याला जबर दुखापत झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकारामुळे केईएममधील निवासी डॉक्टर सकाळी आठ वाजल्यापासून एक दिवसाच्या संपावर गेले आहेत.
रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, डेग्यूची लागण झालेल्या दोन वर्षांच्या एक लहान मुलीला तिच्या नातेवाईकांनी बुधवारी रात्री केईएममध्ये आणले. मुलीची प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्याची गरज होती. मात्र, अतिदक्षता विभागात जागा नसल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांना देण्यात आली. पण, मुलाला सर्वसाधारण विभागात दाखल करून घ्या, अशी मागणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केल्यावर त्याच्यावर तिथे उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक अर्धा तासाला त्याच्या तब्येतीबद्दल रुग्णाच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली. मात्र, यानंतरही चार तरूण रुग्णालयात घुसले आणि त्यांनी तिथे असलेल्या डॉक्टरांना सळईने मारहाण करण्यास सुरूवात केली. डॉ. पुनीत चौधरी, डॉ सुहास आणि डॉ. कौशल अशी मारहाण झालेल्या डॉक्टरांची नावे आहेत. मारहाण झाली त्यावेळी तिथे केवळ महिला सुरक्षारक्षक उपस्थित होत्या. हा प्रकार बघितल्यावर त्यांनी घाबरून तेथून पळ काढला. नातेवाईकांनी सळईने केलेल्या मारहाण डॉक्टरांच्या शरीरावर वळ उठले आहेत.
जखमी डॉक्टरांवर उपचार करण्यात येत असून, याप्रकरणी पोलीसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2015 12:10 pm

Web Title: three doctors of kem hospital in mumbai beaten up by patient relatives
Next Stories
1 परीक्षा अर्ज भरताना महाविद्यालयांची दमछाक
2 डेंग्यूच्या केवळ संशयानेच रुग्णालयातील खाटा फुल्ल!
3 आधी कांदे, आता बकरे
Just Now!
X