News Flash

सांताक्रुझजवळ समुद्रात तिघे बुडाले

सांताक्रुझ येथील समुद्रात पोहोण्यासाठी गेलेली ठाण्यातील तीन मुले बुडाली असून त्यांचा शोध सुरू आहे. भरती असल्याने शोधकार्यात अडथळे निर्माण होत असून त्यासाठी मच्छीमारांची मदत घेण्यात

| August 2, 2014 03:43 am

सांताक्रुझ येथील समुद्रात पोहोण्यासाठी गेलेली ठाण्यातील तीन मुले बुडाली असून त्यांचा शोध सुरू आहे. भरती असल्याने शोधकार्यात अडथळे निर्माण होत असून त्यासाठी मच्छीमारांची मदत घेण्यात आली आहे.
ठाण्याच्या ज्ञान विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात शिकणारी ११ मुले शुक्रवारी सांताक्रुझ येथे समुद्रावर फिरायला आली होती. रमाडा हॉटेलच्या मागच्या बाजूला समुद्रावर जागा असल्याने हे तिथे खेळण्यास गेले होते. त्यापैकी अमितेश यादव, दिवाकर पांडे आणि संजीव यादव हे तिघे समुद्रात पोहत असताना बुडाले. त्यांच्या मित्रांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जीवरक्षकांच्या मदतीनेही त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र त्यांचा पत्ता लागत नव्हता. संध्याकाळी भरती सुरू झाल्यानंतर शोधकार्यात आणखी अडथळे येण्यास सुरुवात झाली. या वेळी येथील स्थानिक मच्छीमारांची मदत घेण्यात आली. रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2014 3:43 am

Web Title: three drown at sea near juhu
Next Stories
1 ठाण्यात ध्वनिनियंत्रण?
2 ‘पीसीपीएमएल’ला न्यायालयाचा दणका
3 बेदरकार वाहनचालकांच्या शिक्षेत वाढ होण्याची शक्यता
Just Now!
X