01 October 2020

News Flash

ट्रक स्लॅबला धडकल्याने तीन जण पडले सेप्टीक टँकमध्ये, चेंबूरमधील घटना

मुंबईत चेंबूरमध्ये वाशी नाका येथे ट्रकची स्लॅबला धडक बसून तीन जण सेप्टीक टँकमध्ये पडले.

मुंबईत चेंबूरमध्ये वाशी नाका येथे ट्रकची स्लॅबला धडक बसून तीन जण सेप्टीक टँकमध्ये पडले. त्यातील एका व्यक्तीला बाहेर काढण्यात यश आले असून एक महिला आणि लहान मुलगा अजूनही आत अडकला आहे.

अग्निशमन दल आणि आरसीएफ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाकडून या दोघांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. बुधवारी सकाळी चेंबूर वाशी नाका म्हाडा कॉलनीजवळ ही दुर्घटना घडली. जमिनीखाली हा सेप्टीक टँक बांधण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2019 12:32 pm

Web Title: three fell in septic tank chembur
Next Stories
1 ग्रामीण भागांत दुष्काळ झळा वाढल्या
2 कुर्ल्यात प्रवाशांना पूलबंदी!
3 अंधेरीतील उच्चभ्रू संकुलात मांजरांवर विषप्रयोग
Just Now!
X