News Flash

तीन महिलांकडून क्लीनअप मार्शलला मारहाण

मुखपट्टी न लावल्याबद्दल जाब विचारल्याचे कारण

प्रतीकात्मक छायाचित्र

लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : मुखपट्टी न लावल्याबद्दल चौकशी करून ती लावण्याची सूचना करणाऱ्या महापालिके च्या क्लीनअप मार्शल तरुणीला मारहाण करण्यात आली. हा प्रसंग बुधवारी दुपारी भांडुप रेल्वे स्थानक परिसरात घडला. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तीन महिलांना अटक के ली.

क्लीनअप मार्शल दर्शना चौहान आपल्या सहकाऱ्यांसोबत बुधवारी भांडुप रेल्वे स्थानक परिसरात कर्तव्य बजावत होत्या. रस्त्यात थुंकणाऱ्या, कचरा करणाऱ्यांसह विनामुखपट्टी फिरणाऱ्यांवरही कारवाईच्या सूचना क्लीनअप मार्शलना देण्यात आल्या आहेत. त्या दृष्टीने चौहान आणि त्यांचे सहकारी पादचाऱ्यांवर लक्ष ठेवून होते. दुपारी दोनच्या सुमारास स्थानक परिसरात एक महिला विनामुखपट्टी बराच काळ रेंगाळताना चौहान यांना आढळली. त्या या महिलेजवळ गेल्या आणि मुखपट्टी का लावली नाही, ती लावा, अशी सूचना करू लागल्या. त्यावरून महिलेने चौहान यांच्यासोबत वाद घातला. त्यांच्यावर हातही उचलला. या महिलेसोबत असलेल्या अन्य दोन महिलांनी चौहान यांना मारहाण करण्यास सुरुवात के ली. झटापटीत एका महिलेने रस्त्यावर पडलेला पेव्हर ब्लॉक चौहान यांच्या डोक्यात घातला.

या हल्ल्यात जखमी झालेल्या चौहान यांना मुलुंड येथील महापालिके च्या अगरवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या तक्रोरीवरून तीन महिलांना अटक करण्यात आली. आरोपी महिला परिसरात घरकाम करतात, असे भांडुप पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक मयेकर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2020 2:26 am

Web Title: three female beaten up cleanup marshals dd70
Next Stories
1 ‘बेस्ट’च्या ताफ्यात दीडशे दुमजली बसगाडय़ा
2 सागरी सेतूसाठीचा रस्ता तात्पुरता
3 चैत्यभूमीचे थेट प्रक्षेपण समाजमाध्यमांवर
Just Now!
X