व्यवसायातील आर्थिक व्यवहारांवरून झालेल्या वादामधून तिघांनी आपल्या भागीदाराचे डोके ठेचून हत्या करण्याची घटना आग्रीपाडा भागात शनिवारी संध्याकाळी घडली.   
  आग्रीपाडा येथील कालापानी भागातील उस्मानिया हे रेस्तराँ मोहम्मद वझीर (६१), त्याचा मुलगा जफर वझीर आणि परवेझ यांच्या मालकीचे आहे. त्यांनी २५ वर्षांपूर्वी हे रेस्तराँ दरमहा भाडेतत्त्वावर अहमद अब्दुल वहाब यांना चालवायला दिले होते. आता मोहम्मद आणि जफर यांनी अहमदकडे भाडे वाढवून मागितले. त्यावरून त्यांच्यात वाद सुरू होता. त्यातून अहमद यांची हत्या झाली. त्यानंतर हल्लेखोरांनी पळ काढला. मात्र आग्रीपाडा पोलिसांना त्या तिघांचा माग घेत त्यांना अटक केली.