News Flash

कणकवलीतील अपघातात जोगेश्वरीतील तिघांचा मृत्यू

कणकवली तालुक्यातील कासार्डे ब्राह्मणवाडी येथील हायवेवर आरामबस आणि व्हॅगन आर यांच्यात झालेल्या अपघातात आई-वडील आणि मुलगी जागीच ठार झाले.

| September 6, 2014 04:37 am

कणकवली तालुक्यातील कासार्डे ब्राह्मणवाडी येथील हायवेवर आरामबस आणि व्हॅगन आर यांच्यात झालेल्या अपघातात आई-वडील आणि मुलगी जागीच ठार झाले. ते जोगेश्वरी पूर्व, मुंबई येथील आहेत.
मुंबई येथून निघालेली जय गणराज बस आणि खारेपाटणच्या दिशेने जाणारी व्हॅगन आर गाडी यांचा कासार्डे ब्राह्मणवाडी येथे अपघात झाला. भरणी घाडीवाडी येथून मुंबई, जोगेश्वरी पूर्व येथे व्हॅगनआर ही गाडी भरधाव वेगात जात होती.या भीषण अपघातात गणेश शामसुंदर पाडावे (३८), सायली गणेश पाडावे (३७) व वेदश्री गणेश पाडावे (१७) हे जागीच ठार झाले. हा अपघात दुपारी झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णलयात पाठवण्यात आले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2014 4:37 am

Web Title: three killed in kankavli accident
Next Stories
1 बोरिवलीत महिलेची हत्या करून चोरी
2 आभासी शिक्षकांचे विद्यादान
3 ‘ढ’ विद्यार्थ्यांच्या विकासासाठी वाचन-लेखन प्रकल्पाचा उतारा
Just Now!
X