News Flash

ताडदेवमध्ये भिंत कोसळून तिघे ठार

ताडदेव येथील पारशी कॉलनीमधील भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तिघे ठार झाले. या तिघांना जखमी अवस्थेत नायर रुग्णालयात नेण्यात आले होते.

| July 14, 2014 01:24 am

ताडदेव येथील पारशी कॉलनीमधील भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तिघे ठार झाले. या तिघांना जखमी अवस्थेत नायर रुग्णालयात नेण्यात आले होते. परंतु तेथे पोहोचण्यापूर्वीच दोघांचा, तर उपचारांदरम्यान एकाचा मृत्यू झाला.
 पाारशी कॉलनीतील इलाभाई इमारतीजवळील भिंत शनिवारी मध्यरात्री २.३०च्या सुमारास कोसळली. त्याखाली मनोजकुमार सिंग (३६), रोहितकुमार सिंग (४६) आणि मनीषकुमार सिंग (२२) हे अडकले. गंभीर जखमी अवस्थेत या तिघांना ढिगाऱ्याखालून काढून नायर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र मनोजकुमार सिंग आणि रोहितकुमार सिंग हे ठार झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. मनीषकुमार सिंग याला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रविवारी सायंकाळी मनीषकुमार सिंगचाही मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2014 1:24 am

Web Title: three killed in wall collapse in tardeo
Next Stories
1 शीव-पनवेल टोलवसुलीचा निर्णय महिनाभरात
2 मंत्रालयातील लाचखोर लिपिकास अटक
3 ट्रेलरच्या धडकेने तरुणाचा मृत्यू
Just Now!
X