खाटांमध्ये मोठी वाढ; रुग्णालयांवरील भार कमी करण्याचा प्रयत्न

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : करोना रुग्णसंख्या वेगाने वाढत असून, खाटा कमी पडू नयेत, यासाठी मुंबईत आणखी तीन ठिकाणी करोना उपचार केंद्र सुरू करण्यासाठी पालिके ने हालचाली सुरू केल्या आहेत. मालाड आणि कांजूरमार्गमध्ये करोना केंद्र उभारण्यात येणार असून, शहर भागासाठी लवकरच जागा निश्चिात करण्यात येणार आहे.

मुंबईत फेब्रुवारीपासून करोनाचा पुन्हा वेगाने फैलाव सुरू झाला. गेल्या आठवड्यापासून रुग्णालयांसह करोना केंद्रांतील खाटा व्यापू लागल्या आहेत. दररोज दहा हजारांवर रुग्णांची नोंद होत असल्याने पालिकेचे आव्हान वाढले आहे. मुंबई महानगर प्रदेशातूनही रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपचारांसाठी पालिके च्या रुग्णालयांमध्ये धाव घेत आहेत. त्यामुळे खाटा वाढविण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार, कांजूरमार्ग येथे क्रॉम्पन अ‍ॅण्ड ग्रीव्हज येथे एक मोठे करोना उपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू झाले असून, महापौर किशोरी पेडणेकर यांनी या कामाची रविवारी पाहणी के ली. जूनपर्यंत हे केंद्र सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यातून २००० खाटा उपलब्ध होऊ शकतील. त्यात अतिदक्षता विभागाच्या २०० खाटांचाही समावेश असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पूर्व नगरात एकही करोना उपचार केंद्र नसल्यामुळे रुग्णांना मुलुंडमधील केंद्रामध्ये जावे लागते. तसेच हे केंद्र झाल्यास पालिके च्या रुग्णालयावरील भार कमी होईल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त के ली. येत्या काळात वरळीतही खाटांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पश्चिाम उपनगरातही मालाडमध्ये एक करोना उपचार केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. सध्या आढळणाऱ्या रुग्णांमधील ८० टक्के रुग्ण हे इमारतींमधील आहेत. त्यात लक्षणे नसलेल्या रुग्णांना गृहविलगीकरणात राहता येते. मात्र, आता लहान घरे, चाळी, वस्त्यांमध्ये रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे अशा रुग्णांसाठी खाटा वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे या विभागांमध्येही खाटा वाढवण्यासाठी रिकाम्या इमारती ताब्यात घेण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान, वरळीत नेहरू सायन्स सेंटर आणि पोद्दार रुग्णालयात ऑक्सिजन खाटांची संख्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती साहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली. ‘एनएससीआय’मध्येही अडीचशे खाटा वाढवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच म्हाडाच्या एका इमारतीतही ३०० खाटांचे विलगीकरण केंद्र तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आजपासून ६१ खासगी केंद्रांवरही लसीकरण

मुंबई : मुंबईत गेल्या आठवड्यात दैनंदिन ५५ हजारांपर्यंत गेलेला लसीकरणाचा वेग गेल्या तीन-चार दिवसांत कमी झाला. रविवारी ३३,२५६ जणांना लस देण्यात आली. अपुऱ्या लससाठ्यामुळे खासगी केंद्रांवरील लसीकरण तीन दिवस ठप्प होते. मात्र, ६१ खासगी केंद्रांना लसपुरवठा करण्यात आला असून, आज, सोमवारी या ठिकाणी लसीकरण होणार आहे.

More Stories onकरोनाCorona
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three more new corona centers in mumbai soon akp
First published on: 12-04-2021 at 02:16 IST